गद्दार नेमके कोण?: शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटलांचा रोख कोणाकडे? 

ही निवडणूक राज्याच्या राजकीय इतिहासाचा "टर्निंग पॉईंट' ठरणार आहे.
Who exactly is a traitor ?: To whom did Shashikant Shinde and Narendra Patil address?
Who exactly is a traitor ?: To whom did Shashikant Shinde and Narendra Patil address?

कोरेगाव : शिवसेनेचे साताऱ्याचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात "गद्दारावर लक्ष ठेवा आणि अशांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवा', असे सूचक वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा धागा पकडून आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "कोण आपल्या बरोबर असतील, नसतील. महाविकास आघाडीची धोरणे कोणी पाळतील, न पाळतील; परंतु आपण सर्वांनी मात्र या निवडणुकीत जोमाने काम करायचे आहे.' या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा रोख कोणाकडे आहे आणि गद्दार नेमके कोण? या विषयीच्या चर्चेला सभेनंतर तोंड फुटले आहे.   

महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त कोरेगाव येथे प्रचार सभा झाली.

या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, प्रचार प्रमुख सारंग पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, बाळासाहेब सोळसकर, शिवाजीराव महाडिक, संजय झंवर, मंगेश धुमाळ आदी प्रमुख उपस्थित होते. 

"पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक काही लोकांना दाखवून देण्यासाठी आहे,' अशा शब्दांत रामराजे यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळून टोला लगावला. ही निवडणूक राज्याच्या राजकीय इतिहासाचा "टर्निंग पॉईंट' ठरणार असून, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे कार्यकर्ते एकवटल्यास यश निश्‍चित आहे. निवडणुकीचे नियोजन शेवटपर्यंत पोचल्यास आणि नियोजनाच्या अंमलबजावणीची जबाबदारी गावपातळीवरील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यास निवडणुकीत यश निश्‍चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, "गेल्या वेळेच्या भाजपच्या सरकारने सुशिक्षितांसाठी केवळ घोषणा, वल्गना केल्या. प्रत्यक्षात काहीच काम केले नाही. विरोधकांचा अपप्रचार करण्यावर जोर असतो, त्यामुळे सर्वांनी दक्ष राहून मतदान करावे. 

आमदार शिंदे म्हणाले, "सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीची ताकद दाखवून देण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. त्यामुळे जोमाने काम केल्यास विजय निश्‍चित आहे.' 

वर्षानंतर महाविकास आघाडीचा कस दाखवणारी ही निवडणूक आहे, असे नमूद करून नरेंद्र पाटील म्हणाले, "आपल्या जिल्ह्यात साहेब या आदरार्थी विशेषणाला परंपरा आहे; परंतु ज्याला घरातलेच कोणी ऐकत नाही, तो भाजपचा पदाधिकारी म्हणून मिरवतोय आणि अशाच प्रकारे अलीकडे जिल्ह्यातील एक जण नवीन साहेब म्हणून त्या पक्षात वावरतोय.'' 

सारंग पाटील, ऍड. कणसे, मेहबूब शेख, राजेंद्र शेलार यांचीही भाषणे झाली. मनोहर बर्गे यांनी प्रास्ताविक, तर भास्कर कदम यांनी सूत्रसंचालन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com