उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरे दोघांनाही एकाच वेळी फटका... वाद पोहोचला कोल्हापुरात!

जिल्हा बॅंकेसाठी जोरदार चुरस
Jaykumar gore-Udayanraje
Jaykumar gore-Udayanraje

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje) व आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांचे पाणीपुरवठा संस्थांतून केलेले ठराव जिल्हा बँकेने सभासद नसल्याचे कारण देत रद्द केले.

याविषयी कच्च्या मतदारयादीत नाव नसल्याने या दोघांनीही आक्षेप घेतले होते. या आक्षेपावर आज कोल्हापुरात विभागीय सहनिबंधकांसमोर सुमारे दीड तास सुनावणी झाली. त्यामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. आता या सुनावणीनंतर खासदार उदयनराजे व आमदार गोरेंचा पाणीपुरवठ्यातील ठराव कायम राहणार का, याची उत्सुकता लागली आहे.

जिल्हा बॅंकेची रणधुमाळी सुरू आहे. सर्वसमावेश पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. त्याला भाजप, काँग्रेस व शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रत्येक पक्षाला आपला संचालक जिल्हा बॅंकेत हवा आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस व शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे; पण अद्यापपर्यंत सर्वसमावेश आघाडीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून इतर पक्षांतील नेत्यांशी चर्चा अथवा बैठक झालेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उदयनराजेंसह आमदार गोरेंना जिल्हा बॅंकेत येण्यापासून रोखण्याची तयारी केलेली आहे.


सध्या जिल्हा बॅंकेची मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या कच्च्या मतदारयादीवर तब्बल ४६ आक्षेप व हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर सध्या कोल्हापूरला विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू आहेत. यापैकी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्वात मोठी सुनावणी आज कोल्हापुरात झाली. पाणीपुरवठा संस्थेतून खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांचे ठराव करण्यात आले होते. हे ठराव संबंधित दोघेही संस्थेचे सभासद नसल्याने जिल्हा बँकेने रद्द केले होते. त्यावर खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांनी सहनिबंधकांकडे आक्षेप दाखल केले होते. या आक्षेपावर आज सहनिबंधकांसमोर सुनावणी झाली. सुमारे दीड तास सुनावणी चालली. जिल्हा बँकेकडून, तसेच खासदार व आमदारांकडून वकिलांच्या माध्यमातून म्हणणे मांडण्यात आले. सुमारे दीड तास ही सुनावणी चालली. दोन्ही बाजूंचे म्हणणे सहनिबंधकांनी ऐकून घेतले आहे. येत्या सोमवारी (ता. २०) किंवा मंगळवारी (ता. २१) या सुनावणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणी सहनिबंधक काय निर्णय देणार, तसेच भाजपच्या खासदार, आमदारांचे पाणीपुरवठ्यातील दोन ठराव कायम राहणार, की रद्द होणार याची उत्सुकता लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com