शिवसेनेतील वाद पेटला : दोन गट आमने-सामने; पक्षनिरीक्षकांनी बैठक केली रद्द

तत्पूर्वीच शिवसेनेतील दोन गट आमने सामने आले.
Two groups from Solapur Shiv Sena came face to face
Two groups from Solapur Shiv Sena came face to face

सोलापूर : सोलापूर शिवसेनेतील वाद काही केल्या मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठ पातळीवर सुरू असलेला हा वाद आता युवा सेनेपर्यंत येऊन पोचला आहे. जिल्हा निरीक्षकांसमोरच युवा सेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या समर्थकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वैतागून शेवटी निरीक्षकांनीच बैठक रद्द करून टाकली. (Two groups from Solapur Shiv Sena came face to face)

सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर आणि शहर दक्षिण या भागातील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. युवा सेनेचे सोलापूर जिल्हा निरीक्षक विपुल पिंगळे हे या बैठकीत मार्गदर्शन करणार होते. तत्पूर्वीच शिवसेनेतील दोन गट आमने सामने आले. या प्रकारामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. 

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यासह शहरप्रमुख विठ्ठल वानकर हेही या बैठकीसाठी आवर्जून आले होते. पण, बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच एका बाजूला जिल्हा प्रमुख काळजे यांचे कार्यकर्ते, तर दुसऱ्या बाजूला शहरप्रमुख वानकर यांचे कार्यकर्ते यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

वानकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘मनीष काळजे हटाव, युवा सेना बचाव.... मनीष काळजे यांचा धिक्कार असो’ अशी घोषणाबाजी तसेच फलक घेऊन वानकर यांच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली.

एकीकडे वानकर यांचे कार्यकर्ते घोषणा देत असतानाच त्यांना काळजे यांच्या कार्यकर्त्यांकडून उत्तर देण्यास सुरूवात झाली. त्यातून काळजे यांच्या कार्यकर्त्यांनी वानकर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‘मनीष काळजे तुम आगे बढो; हम तुम्हारे साथ है" अशी एकमेकांच्या विरोधातील घोषणाबाजीने शासकीय विश्रामगृहाचा परिसर दणाणून गेला होता.

ही सर्व घोषणा युवा सेनेचे जिल्हा निरीक्षक विपुल पिंगळे यांच्यासमोरच सुरू होती. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अनकेदा मध्यस्थी करूनही घोषणाबाजी थांबलीच नाही. त्यामुळे निरीक्षक पिंगळे यांनी शेवटी वैतागून बैठकच रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे सुद्धा त्या ठिकाणी आले होते. त्यानंतरही दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची एकमेकाच्या विरोधातील घोषणाबाजी सुरूच होती. शिंदे यांनीही दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समाजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र. दोन्हीकडचे कार्यकर्ते थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. या घटनेमुळे शिवसेनेतील राजकीय गटबाजीची शहरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com