पडळकरांच्या गाडीवर हल्ला : शेतकऱ्यांच्या वेशातून जाऊन पोलिसांनी दोघांना पकडले

ते दोघे संशयित आरोपी मागील दोन दिवस शेतातच राहतहोते.
Two arrested for attacking Gopichand Padalkar's car
Two arrested for attacking Gopichand Padalkar's car

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अमित सुरवसे याने सोलापुरात 30 जूनच्या रात्री दगड मारला होता. त्यानंतर तो आणि त्याचा साथीदार नीलेश क्षीरसागर हे दोघे पसार झाले होते. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने आज (ता. 3 जुलै) बक्षीहिप्परगा येथून त्यांना ताब्यात घेतले. ते दोघे संशयित आरोपी मागील दोन दिवस शेतातच राहत असल्याने पोलिसांनीही संशय येऊ नये; म्हणून शेतकऱ्यांचा पोषाख परिधान केला होता. (Two arrested for attacking Gopichand Padalkar's car)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवारांवर आमदार पडळकर यांनी 30 जून रोजी टिका केली होता. त्याचा राग मनात धरून अमित सुरवसे याने आमदार पडळकरांच्या गाडीवर दगड मारल्याचा पोलिसांना संशय आहे.

तत्पूर्वी, अमित याने पडळकर हे कार्यक्रम संपवून त्या परिसरातून कधी जाणार आहेत, याची माहिती मिळविली. रात्री पावणेआठच्या सुमारास त्यांच्या गाड्यांचा ताफा मड्डी वस्ती परिसरात आला. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अमितने जवळ ठेवलेला दगड गाडीवर टाकला. दगड टाकल्यानंतर तत्काळ त्याने तिथून पळ काढला. त्यावेळी त्याने "महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार झिंदाबाद' अशा घोषणा दिल्याचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यामुळे तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच कार्यकर्ता असल्याची चर्चा सुरू झाली. 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटोही व्हायरल झाले. पोलिस दोन दिवसांपासून हल्लेखोराचा शोध घेत होते. पडळकर समर्थकांनी शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण चिघळण्यापूर्वीच त्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यासाठी पोलिसांनी सायबर क्राईमचीही मदत घेतली. संशयित अमित सुरवसे व नीलेश क्षीरसागर या दोघांना पकडण्याची प्रमुख जबाबदारी पोलिस आयुक्तांनी शैलेश खेडकर यांच्यावर सोपविली होती. 

घटनेनंतर अमित सुरवसे व नीलेश क्षीरसागर यांनी सोलापूर शहरातून काढला पळ काढला. सावळेश्‍वर टोल नाक्‍यावर सीसीटीव्ही असल्याने त्यांनी मार्ग बदलला. गेली दोन दिवस त्यांचा दहिटणे, बक्षिहिप्परगा व सोलापूर शहर परिसरात दुचाकीवरून वावर सुरू होता. मास्क लावून हॉटेलमधून पार्सल जेवण घेऊन जायचे. एखाद्या शेतात मुक्‍काम करायचे.  

अमित सुरवसे व नीलेश क्षीरसागर हे दोघेही बक्षीहिप्परगा याठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी वेशांतर केले. चक्क शेतकऱ्याचा वेष धारण करून गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याजवळ पोचले. अगदी जवळ आल्यानंतर त्या दोघांना ते पोलिस असल्याचे समजले. मात्र तोपर्यंत ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. 

पोलिस आयुक्‍तांचा विश्‍वास सार्थ ठरवित खेडकर यांच्या पथकाने त्यांना शनिवारी (ता. ३ जुलै) पकडले. शंकर मुळे, राजेश चव्हाण, विद्यासागर मोहिते, सुहास अर्जुन, सनी राठोड, राहूल गायकवाड, विजयकुमार वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्या दोघांना गुन्हे शाखेने जोडभावी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com