ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू झालंय : गिरीश महाजनांचा दावा 

राज्यात तीन पक्ष एकत्र येऊनसुद्धा, सत्ता असूनही लोकं तुमच्या बाजूने उभा उभारायला तयार नाहीत. जनतेचा कौल काय आहे आणि राज्य सरकारबद्दल जनतेचे मत काय आहे, हे दिसून येत आहे.
Thackeray government's countdown has started: Girish Mahajan's claim
Thackeray government's countdown has started: Girish Mahajan's claim

मुंबई : 'धुळे-नंदूरबार, पुणे, नागपूर, औरंगाबाद या विधान परिषदेच्या चार जागा आम्ही शंभर टक्के जिंकणार आहोत. शिक्षक मतदारसंघातूनही एखादी जागा आम्हाला मिळेल. आता निवडणुका सुरू झाल्या आहेत. राज्यात सत्ता असूनसुद्धा महाविकास आघाडीचा दारूण पराभव होत असेल तर हे सरकारचं काउंटडाउन सुरू झालं आहे. या सरकारबाबतचा असंतोष उद्या (ता. 4 डिसेंबर) सकाळपर्यंत दिसून येईल,' असा दावा माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. 

धुळे-नंदूरबार विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी वरील दावा केला आहे. ते म्हणाले की धुळे-नंदूरबारचा निकाल काय येणार, याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे मी एक दिवसच धुळ्याला गेलो होतो, त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांची बैठक घेतली. त्यात मी सांगितले होतं की धुळ्यातील विरोधी उमेदवार अभिजित पाटील यांना 98 ते 99 मतं मिळतील, शंभर मतांपर्यंत हा उमेदवार जाणार नाही, याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. त्यांनी शंभर मतं घेतली, तर तो आपला विजय नाही, असं मी समजेन. विशेष म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जसाचा तसा निकाल आला आहे. 

महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या 15 ते 16 जागा भाजपपेक्षा जास्त आहेत. तरीही महाविकास आघाडीची 117 मतं फुटली आणि आमच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाला, ही सुरुवात आहे. कोरोना आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. जनमत आता बदलत चालंलं आहे आणि मोठ्या मताधिक्‍क्‍यांनी अमरिश पटेल यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. 

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर धुळे-नंदूरबारमधील पहिलीच निवडणूक होती, त्याबाबत महाजन म्हणाले की, खडसे यांच्या भाजप सोडण्यामुळे उत्तर महाराष्ट्रात काहीही फरक पडणार नाही. धुळे, नंदूरबार, नाशिक, नगरला एखाद-दुसरी जागासुद्धा इकडे तिकडे होईल, असे मला वाटत नाही. त्याबाबतची चर्चा म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असा प्रकार आहे 

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांचे टीमवर्क महत्त्वाचं ठरलं. धुळे-नंदूरबार ही जागा तर येणारच होती. पण, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील जागांवरसुद्धा आमचा उमेदवार निवडून येणार आहे. शिक्षक मतदारसंघासुद्धा आमची एखादी जागा निवडून येणार आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र येऊनसुद्धा, सत्ता असूनही लोकं तुमच्या बाजूने उभा उभारायला तयार नाहीत. जनतेचा कौल काय आहे आणि राज्य सरकारबद्दल जनतेचे मत काय आहे, हे दिसून येत आहे, असेही महाजन यांनी या वेळी नमूद केले. 

महापालिका, गोटेंबाबतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला 
धुळे महानगरपलिका निवडणुकीतही आमच्या 50 जागा येतील, असे सांगितले होते. त्या वेळी आमच्या 50 जागा आल्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनिल गोटे यांनी अनामत रक्कम वाचवून दाखवावी, असे आव्हान दिले होते आणि त्या निवडणुकीत त्यांना अनामत गमावावी लागली होती, असेही या वेळी गिरीश महाजन यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com