पडळकरांच्या गाडीवर दगड फेकणाऱ्या अमित सुरवसेच्या छातीवर पवारांच्या छायाचित्राचे गोंदण - Tattoo of Sharad Pawar's picture on the chest of Amit Suravase who threw stones at MLA Padalkar's car | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

पडळकरांच्या गाडीवर दगड फेकणाऱ्या अमित सुरवसेच्या छातीवर पवारांच्या छायाचित्राचे गोंदण

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 जुलै 2021

तरीही, पडळकरांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली.

सोलापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील टिकेचा राग मनात धरून सोलापुरातील अमित सुरवसे या तरुणाने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड मारला होता. त्याच्या सोबतीला नीलेश क्षीरसागर हादेखील होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर एक बाब समोर आली. अमितच्या छातीवर शरद पवार यांचा चित्र गोंदलेले असून त्याखाली ‘द वॉरिअर' असे लिहिले आढळून आले आहे. (A tattoo of Sharad Pawar's picture on the chest of Amit Suravase who threw stones at MLA Padalkar's car)

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार पडळकर यांनी राज्यभर घोंगडी बैठकांचे नियोजन केले होते. त्या निमित्ताने पडळकर हे 30 जून रोजी सोलापुरात आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत तिसऱ्या आघाडीवरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला होता. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी सोलापुरात विविध ठिकाणी बैठका घेतल्या. 

हेही वाचा : सोलापूरचे कारभारी होण्यासाठी दोन मामांमध्ये चढाओढ!

भवानी पेठ परिसरातील बैठक आटोपून पडळकर सोलापुरातील सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृहाकडे निघाले होते. त्यावेळी त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या अमित सुरवस याने पडळकरांच्या गाडीच्या समोरील काचेवर मोठा दगड फेकला आणि तिथून पळ काढला. तीन दिवस अमित पोलिसांना सापडलाच नाही. शेवटी हिप्परगा परिसरातील एका शेतातील झाडाखाली ते दोघेही पोलिसांना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याकडून बॉण्ड लिहून घेऊन सोडून दिले. आता त्यांना न्यायालयातून जामीन घ्यावा लागणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

 
अमित सुरवसेकडून त्या कृत्याची कबुली

अमित सुरवसे याला पकडल्यानंतर जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. त्यावेळी अमित हा पदवीधारक असून तो शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करतोय, असे पोलिसांनी सांगितले. चौकशीवेळी त्याने पोलिसांना सांगितले की, शरद पवार यांचे राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. महिलांना आरक्षण दिले. त्यामुळे अनेक गोरगरिब कुटुंबातील मुली नोकरीला लागल्या. शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळाला. समाजकारण करताना त्यांनी स्वत:च्या कुटुंबाकडेही पुरेसा वेळ दिला नाही. तरीही, पडळकरांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. त्यामुळे मी ते कृत्य केल्याची कबुली अमित सुरवसे याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख