पंढरपुरात राष्ट्रवादीला धक्का : आघाडीतील घटक पक्षाने भरला अर्ज 

राष्ट्रवादीसाठी हा धक्का मानला जात आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana .jpg
Swabhimani Shetkari Sanghatana .jpg

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचा  घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  उमेदवारी जाहीर केली आहे. बुधवार (ता. २३ मार्च) तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीसाठी हा धक्का मानला जात आहे.

पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पंढरपूरात येऊन उमेदवारीची चाचपणी केली आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. उद्या पर्यत भाजप आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॅाम्बमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आहे. अशातच पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फुट पडण्याची शक्यता आहे. घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीला कोंडीत पकडले आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसने उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी ही पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  मागणी करून राष्ट्रवादीला दुसरा धक्का दिला आहे. 2009 मध्ये आमदार भारत भालके यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी आमदार भारत भालके यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत राज्याच्या राजकारणात ओळख तयार केली होती. 2014 मध्ये पुन्हा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी परिचारकांचा आमदार भारत भालके यांच्याकडून निसटत्या मतांनी पराभव झाले होते.

2019 मध्ये राज्यात स्वाभीमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना महाविकस आघाडीत सहभागी झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचे  सरकार आहे. दरम्यान स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी हे महाविकस आघाडीवर नाराज आहेत. त्यातूनच त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवारी देवून आपली नाराजी व्यक्ती केली आहे. राजू शेट्टी लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करतील अशी ही माहिती आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. यावेळी स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, महिला आघाडी अध्यक्षा विश्रांती भुसनर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अॅड. राहुल घुले, माजी तालुका अध्यक्ष दत्तात्रय पाटील, प्रदेश प्रवक्ते रणजीत बागल, प्रताप गायकवाड, सोलापूर विभागाचे अध्यक्ष महमूद पटेल आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com