सोलापूर स्थायी समिती सभापतीची निवडणूक पुढे ढकलली

एमआयएमचा गटनेता कोण हा वाद नगरविकास खात्याकडे पोहोचल्याने आजच्या निवडीस नगरविकास खात्यातर्फे स्थगिती देण्यात आली आहे. सदस्य निवडीचा अहवाल सादर करण्यात यावा. त्यानंतरच निवड प्रक्रिया व्हावी असे देखील नगरविकास खात्याने पालिकेच्या आयुक्तांना कळविले आहे. त्यामुळे विजयाची तयारी केलेल्या सत्ताधारी भाजपचा हिरमोड झाला.
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत घोडा बाजार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी घोडा बाजार करुन विरोधी पक्षातील नगरसेवक फोडल्याचा आरोप पालिकेचे विरोधीपक्ष नेते अमोल शिंदे यांनी केला. 

तर दुसरीकडे एमआयएमचा गटनेता कोण हा वाद नगरविकास खात्याकडे पोहोचल्याने आजच्या निवडीस नगरविकास खात्यातर्फे स्थगिती देण्यात आली आहे. सदस्य निवडीचा अहवाल सादर करण्यात यावा. त्यानंतरच निवड प्रक्रिया व्हावी असे देखील नगरविकास खात्याने पालिकेच्या आयुक्तांना कळविले आहे. त्यामुळे विजयाची तयारी केलेल्या सत्ताधारी भाजपचा हिरमोड झाला. 

जवळपास तीन वर्षांनंतर सोलापूर महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक यंदा होणार होती. २०१८ साली सत्ताधारी भाजपच्या विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या गटात चढाओढ पाहायला मिळाली होती. ऐन अर्ज दाखल करण्याच्या वेळी विजयकुमार देशमुख गटातील एका कार्यकर्त्यांने सुभाष देशमुख गटातील सभापती पदाच्या उमेदवाराचा अर्ज पळवून नेला होता. हा सगळा गोंधळ न्यायलयात पोहोचल्याने जवळपास ३ वर्ष स्थायी समितीच्या सभापतीविनाच पालिकेचा कारभार सुरु होता. 

या प्रकरणात न्यायलयाने आदेश दिल्याने स्थायी समितीच्या सदस्यांची निवड २० फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. आणि आज स्थायी समिती तसेच परिवहन समितीच्या सभापतींची निवड होणार होती. मात्र सदस्य निवडीवरुन एमआयएममध्ये वाद झाला होता. यामध्ये एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी स्थायी समितीच्या सदस्यापदी  स्वत:चेच नावाची शिफारस केली होती. तर एमआयएममधील दुसऱ्या गटाचे नेते असलेल्या तौफीक शेख यांनी अधिकृत गटनेते पद हे त्यांच्या गटातील नूतन गायकवाड यांच्याकडे असल्याचा दावा केला होता. 

तसेच विभागीय आयुक्तांकडे नूतन गायकवाड यांचीच नोंद आहे. नूतन गायकवाड यांनी सदस्य म्हणून पूनम बनसोडे यांची शिफारस केली होती. त्यामुळे ही शिफारस ग्राह्य धरण्यात यावी. अशी मागणी एमआयएमच्या तौफीक शेख आणि पूनम बनसोडे यांनी केली होती. मात्र महापौर श्रीकांचना यन्नम यांनी रियाज खरादी यांची शिफारस ग्राह्य धरली. 

याच सदस्य निवडीविरोधत पूनम बनसोडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत सदस्य निवड रद्द करण्यात यावी, तसेच स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती. पूनम बनसोडे यांनी राज्याच्या नगरविकास खात्याकडे देखील या प्रकरणाची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत नगर विकास खात्याने आजच्या निवडीला सात दिवसासाठी स्थगिती दिल्याचे प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com