स्वबळावर लढण्याबाबत आढळराव म्हणाले... - Shivajirao Adhalrao Patil said about the elections in Shirur taluka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

स्वबळावर लढण्याबाबत आढळराव म्हणाले...

नितीन बारवकर
शनिवार, 19 जून 2021

आगामी जिल्हा परिषद, नगर परिषदेसह; सहकारातील निवडणुका वेळप्रसंगी स्वबळावर लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे​.

शिरूर : आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षांशी आघाडी करून याबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील हा निर्णय होईल तेव्हा होईल. तथापि, शिरूर तालुक्‍यात आगामी जिल्हा परिषद, नगर परिषदेसह; सहकारातील निवडणुका वेळप्रसंगी स्वबळावर लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे, असे शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. 

कोविड काळात समाजावर ओढवलेली परिस्थिती, यात तरुणांचे गेलेले बळी, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे याबरोबरच; प्रलंबित विकास कामांसंदर्भात स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी आढळराव पाटील यांनी स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांसह शिरूर तालुक्यातील काही गावांचा दौरा केला. या दौऱ्यानंतर शिरूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आढळराव यांनी वरील माहिती दिली.  

हेही वाचा : आढळरावांनी आतापासूनच सुरू केली आगामी लोकसभा लढविण्याची तयारी 

आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षांशी आघाडी करून, याबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख घेतील. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील हा निर्णय होईल तेव्हा होईल. तथापि, शिरूर तालुक्‍यातील आगामी जिल्हा परिषद, नगर परिषदेसह; सहकारातील निवडणुका वेळप्रसंगी स्वबळावर लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद, पंचायत समितीसह; शिरूर नगर परिषद, घोडगंगा साखर कारखाना, शिरूर बाजार समिती व इतर निवडणुका आघाडी करून लढायच्या की स्वतंत्रपणे याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. तथापि, वेळप्रसंगी या निवडणुका स्वबळावर लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे. त्यासाठीच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ मिळावे, स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसैनिकांना सज्ज करावे या उद्देशाने गावभेट दौरे चालू केले आहेत. आगामी वर्षभराच्या दौऱ्यांचे नियोजन झाले असून, त्यासाठी पुढे दर 10-15 दिवसांनी दौरे, बैठका चालू राहतील.’’

शिरूर, शिक्रापूर येथे चाइल्ड कोविड सेंटर उभारणार 

कोरोनाच्या दोन लाटांनी मोठी हानी झाली. आता तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका वर्तविला जात आहे. त्यादृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेत असून, पूर्वतयारी म्हणून शिवसेनेच्या वतीने मंचर येथे ‘चाइल्ड कोविड सेंटर’ उभे केले आहे. त्याच धर्तीवर सरकारची कुठलीही मदत न घेता शिवसेनेच्या वतीने शिरूर किंवा शिक्रापूर येथेही लहान मुलांसाठी केअर सेंटर उभे केले जाईल, असे आढळराव पाटील यांनी सांगितले. रांजणगाव एमआयडीसीतील कंपन्यांच्या साहायाने शिरूरमध्ये अद्ययावत सेंटर उभे राहण्यासाठी पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख