डीपीसीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व : साळुंखे, जानकर, भालकेंना संधी, कॉंग्रेसकडून म्हेत्रे, नरोटे

राज्यात ठरलेल्या सत्तेच्या वाट्याचा फॉर्म्युला आता जिल्हा पातळीवरही पोचला आहे.
Selection of Siddharam Mhetre, Chetan Narote, Deepak Salunkhe, Bhagirath Bhalke on Solapur DPC
Selection of Siddharam Mhetre, Chetan Narote, Deepak Salunkhe, Bhagirath Bhalke on Solapur DPC

सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातील सत्तेचा वाटा निश्‍चित झाला आहे. राज्यात ठरलेल्या सत्तेच्या वाट्याचा फॉर्म्युला आता जिल्हा पातळीवरही पोचला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सोलापूर जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्‍त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.

जिल्हा नियोजन समितीवरील 14 नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून लवकरच त्याबाबतचा सरकारी पातळीवर निर्णय होणार आहे. समितीच्या 14 जणांच्या नियुक्‍त्यांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक सहा जागा मिळाल्या आहेत. महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि कॉंग्रेसला प्रत्येकी चार जागांवर संधी मिळाली आहे. (Selection of Siddharam Mhetre, Chetan Narote, Deepak Salunkhe, Bhagirath Bhalke on Solapur DPC) 

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात सोलापूर जिल्ह्याला हुलकावणी मिळाल्याने दुसऱ्या फळीतील नेत्यांना किमान जिल्हा नियोजन समितीवर तरी संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची धुरा सुरुवातीला मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती. कोरोनाचे संकट आणि वाढती दगदग नको; म्हणून वळसे पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्रीपद सोडले. त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. कोरोनाच्या संकटात तत्कालिन पालकमंत्री आव्हाड हेच कोरोनाबाधित झाल्याने आयत्यावेळी सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर आली. गेल्या सव्वा वर्षापासून सोलापूरचे पालकमंत्रीपद भरणे यांच्याकडे आहे 

जिल्हा नियोजन समितीवर पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या शिफारशीनुसार विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्‍त्यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या नियुक्‍त्यांचा मार्ग मोकळा झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला सहा, तर शिवसेना आणि कॉंग्रेसला प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. विश्‍वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, विशेष निमंत्रितांच्या 14 नियुक्‍त्या अंतिम झाल्या आहेत. त्यामध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दीपक साळुंखे या दोन ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. तीनही पक्षांनी या समितीवर संधी देताना नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घातला आहे. 

राष्ट्रवादीने त्यांच्या वाट्याला आलेल्या सहा जागांमध्ये माजी आमदार दीपक साळुंखे, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव, माळशिरस राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर, बार्शीचे निरंजन भूमकर, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, माळशिरसचे सुरेश पालवे-पाटील यांना संधी दिल्याचे समजते.

कॉंग्रेसने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महापालिकेतील पक्षाचे गटनेते चेतन नरोटे,  सोलापूरचे नगरसेवक प्रवीण निकाळजे यांना संधी दिल्याचे समजते. कॉंग्रेसच्या चौथ्या नावाबद्दल साशंकता आहे. शिवसेनेच्या कोठ्यातून शिवसेना नेत्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, पंढरपूरचे महेश साठे, रफिक नदाफ यांना संधी दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

विधानसभेतील पराभूतांना संधी 

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत पराभूत झालेले सिद्धाराम म्हेत्रे, दीपक साळुंखे, उत्तम जानकर, निरंजन भूमकर आणि पोटनिवडणुकीत पराभूत झालेले भगिरथ भालके यांना त्यांच्या त्यांच्या पक्षाने जिल्हा नियोज समितीवर संधी दिल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या कोठ्यातून आलेल्या चारही नावांवर शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या समर्थकांचेच वर्चस्व राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com