सरकार पडणार नसल्याने चंद्रकांतदादांकडून अशी विधाने

राजकारणाची पातळी कुठपर्यंत जाऊ द्यायची,हे सर्वांनी बघितलं पाहिजे.
सरकार पडणार नसल्याने चंद्रकांतदादांकडून अशी विधाने
Sanjay Rathore gave the Answer  to Chandrakant Patil's criticism

सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दोन महिन्यांत पडणार, चार महिन्यांत पडणार, वर्षभरात पडणार, हे सर्व आता बंद झालं आहे. त्यामुळे आता काही तरी बोलावं लागतं; म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अशी विधाने केली जात आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अगदी कोरोनाकाळातही दखलपात्र काम सरकारकडून केलं गेलं आहे आणि हे सरकार पाच वर्ष चालणार आहे, असे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. (Sanjay Rathore gave the Answer  to Chandrakant Patil's criticism)

सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे आज (ता. १२ सप्टेंबर) सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राठोड बोलत होते.
 
हेही वाचा : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पुतणीचा कॉंग्रेसच्या आमदाराकडून छळ 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना, ‘मुख्यमंत्र्यांनी एखाद्या मंत्र्यांच्या कानाखाली लावली तरी कोणी सत्तेतून बाहेर पडणार नाही,’ असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना माजी वनमंत्री राठोड म्हणाले की, ‘‘चंद्रकांतदादा पाटील हे जेष्ठ नेते आहेत. राजकारणाची पातळी कुठपर्यंत जाऊ द्यायची, कशी भाषा बोलायची हे सर्वांनी बघितलं पाहिजे.’’ 

संजय राठोड म्हणाले की, ‘‘मी स्वतः होऊन राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. माझा राजीनामा पत्रकार परिषदेसमोर वाचून दाखवला. मागच्या 30 वर्षांपासून मी समाजकारणात आहे. चार टर्म शिवसेनेचा आमदार म्हणून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त फरकाने निवडून येत आहे."

राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करायचा की नाही, हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. कोणाला मंत्री करायचे किंवा कोणाला करायचे नाही, हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या हाती असते, असे उत्तर राज्याच्या मंत्रिमंडळात आपली वर्णी केव्हा लागणार या प्रश्नावर राठोड यांनी दिले.  

मागच्या युतीच्या सरकारमध्ये मी महसूल राज्यमंत्री होतो. त्या काळात आम्ही २५ मागण्या केल्या होत्या, त्याच आमच्या बंजारा समाजाच्या 25 मागण्यांची दखल सरकारने घ्यावी, अशी मागणी आहे. या मागण्यासांठी मी राज्यभर फिरणार आहे. या विषयासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन भेटायलाही जाणार आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ह्यासंदर्भात बैठक व्हावी, अशी समाजाची मागणी आहे. त्यानुसार मी ठाकरे यांना विनंती करणार आहे.

Related Stories

No stories found.