Raju Shetty criticizes those who call farmers Khalistanis
Raju Shetty criticizes those who call farmers Khalistanis

शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे पाकिस्तानची औलाद : राजू शेट्टींची टीका 

शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून हिणवणाऱ्या सरकारला वठणीवर आणले जाईल.

कोल्हापूर : शेतकऱ्यांना जातीयवादी, खलिस्तानी म्हणून हिणवणारे जे आहेत, ते पाकिस्तानची औलाद आहे. परदेशातील लोकांना भारतीय शेतकऱ्यांची बाजू योग्य वाटली म्हणून तेही पाठिंबा देत आहेत. पण, कायम परदेशात असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक तत्काळ रद्द करावेत. हे विधेयक रद्द केले नाही तर केंद्र सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज आत्मक्‍लेश आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. 

शेट्टी म्हणाले, मोदी सरकारने केलेल्या कृषी विधेयकाला देश आणि परदेशातूनही विरोध होत आहे. भारतातील शेतकऱ्यांची बाजू परदेशी सरकार घेत आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून हिणवणाऱ्या सरकारला वठणीवर आणले जाईल. वास्तविक शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारा पाकिस्तानची औलाद असणार आहे. शेतकऱ्यांना विचारात न घेता, कोरोनाचे लॉकडाऊन सुरु असताना अदानी आणि अंबानीचे गुलाम करणाऱ्यासाठी केंद्र सरकारने घातलेला हा घाट हाणून पाडला जाईल. 

या वेळी कार्याध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, अजित पोवार, विक्रम पाटील, राम शिंदे, संजय चौगले, शैलेश आडेक, विठ्ठल मोरे, आण्णा मगदूम, भिमगोंड पाटील, राजू पाटील, सचिन शिंदे, पायगोंडा पाटील, अविनाश मगदूम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

कंत्राटी शेती पद्धत शेतकऱ्यांना लुबाडणारी आहे. कोणी स्टार्चचे कंत्राट घेतो म्हणतो, कोण कलिंगड घेतो म्हणतो, कोण मका घेतो म्हणतो. एकाने (सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता) कोबड्या घेतो; म्हणून सांगितले होते. तोही फरारी झाला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे उदाहरण राजू शेट्टी यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com