शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवूनच काम करेन  - Praniti Shinde said that she will work with Shinde Saheb | Politics Marathi News - Sarkarnama

शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवूनच काम करेन 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

कार्याध्यक्षपदापेक्षा माझ्यासाठी जनता आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. असे, मत कॉंग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशकार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी येथे व्यक्त केले.

सोलापूर : कार्याध्यक्षपदापेक्षा माझ्यासाठी जनता आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. असे, मत कॉंग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशकार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सर्वांच्या सहकार्यामुळे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यामुळे मला प्रदेश कार्याध्यक्ष पदाची संधी मिळाली. पहिल्यांदाच पक्षाची मोठी जबाबदारी मिळाली. मला संघटना चालवायचा जास्त अनुभव नाही. पण, आपल्या सारख्या अनुभवी जेष्ठ मंडळीकडून सल्ला घेऊन काम करण्याचे प्रयत्न करणार आहे. 

सुशीलकुमार शिंदे यांनी ज्या निष्ठेने पक्षाचे काम आजपर्यंत केले. कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले, त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून काम करेन. कार्यकर्त्यामुळे आम्ही आहोत म्हणून मला कॉंग्रेस कार्याध्यक्षपदापेक्षा जनता आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. मी कुठे चुकत असेल तर जरूर सांगावे. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहे.

मनावर घेतले की शरद पवार कार्यक्रमच करतात

मुंबईत शुक्रवारी (ता. १२ फेब्रुवारी) रोजी नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले व पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी नाना पटोले यांनी मोदी सरकार चले जावचा नारा दिला. मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय, महिला अत्याचार, दीन दलित मगासवर्गीयांवर होणारा अन्यायाविरुध्द आवाज उठवून हा देश भाजपमुक्त करायचा आहे. मोदी हटाव-देश बचाव, मजबूत कार्यकर्ता मजबूत देश हे आपण सोलापूरपासुन सुरु करूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही मजबूत करण्यासाठी मी कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपद स्वीकारले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

शरदरावांनी मला वेड लावले : सुशीलकुमार शिंदे

यावेळी, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार धनाजी साठे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख