अजित पवारांचा खोटारडेपणा उघड; पंढरपुरातील मतदारांनी त्यांना जागा दाखवावी  - Prakash Ambedkar criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

अजित पवारांचा खोटारडेपणा उघड; पंढरपुरातील मतदारांनी त्यांना जागा दाखवावी 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 मार्च 2021

विधानसभेत त्यांना घेराव घातला जाऊ नये; म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वीज कनेक्‍शन तोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले

सोलापूर : वीजबिलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. विधानसभेत त्यांना घेराव घातला जाऊ नये; म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वीज कनेक्‍शन तोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, शेवटी पुन्हा वीज कनेक्‍शन तोडणीवरील स्थगिती हटवली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना संधी मिळाली आहे की त्यांनी खोटारड्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. 

सोलापुरात शनिवारी (ता. 20 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. या वेळी आंबेडकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावरही टीका केली. 

हेही वाचा  : मोहिते पाटलांच्या मर्जीने राष्ट्रवादीत पदाधिकारी निवडी; उत्तम जानकरांनी खदखदीला तोंड फोडले 

नितीन राऊत हे दुबळे मंत्री 

ऊर्जामंत्री नितीन राऊत हे दुबळे मंत्री असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. वाढीव वीज बिलांसदर्भात ऊर्जा खात्याने 50 टक्के वीजबिल माफीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, राऊत त्यावर ठामपणे भूमिका घेऊ शकले नाहीत. ते कॉंग्रेसचे दुबळे मंत्री आहेत. त्यातही मागासवर्गीय असल्याने बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत. या सर्वामध्ये बारामती अडथळा असल्याची टीका वंचितचे प्रमुख आंबेडकर यांनी केली. 

वीज कनेक्‍शन तोडणीस येणाऱ्याला बडवा 

दरम्यान, वीज कनेक्‍शन तोडणीसाठी कोणी आल्यास त्याला बडवा असे धक्कादायक आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केले. "कोणी वीज कापायला आले तर त्यांना बडवा, कितीही गुन्हे दाखल झाले तर होऊद्या. शासकीय गुन्हे चालवायला किती सरकारी वकील आहेत?' असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनी वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्‍शन तोडणीला विरोध दर्शवला. 

हे पंतप्रधानपदाला शोभणारे नाही 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची गरिमा घालवली, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. देश स्वतंत्र्य झाल्यापासून कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत पंतप्रधान केवळ 1 किंवा 2 वेळा जातात. मात्र बंगालच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत 17 वेळा जाऊन आले आहेत. हे पंतप्रधान पदाला शोभणारे नाही. गल्लीतला कार्यकर्तादेखील आजकाल पंतप्रधानावर टीका करू लागला आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा घालवली आहे. भारतीय जनता पक्षाने याचा विचार केला पाहिजे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. तसेच, चीनने सीमेवरुन आपले सैन्य अद्याप मागे घेतलेले नसताना त्यांना गुंतवणुकीसाठी कशी काय परवानगी देण्यात आली, याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी करावा, असा सवालही आंबेडकरांनी उपस्थित केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख