फडणवीस सांगतील तेंव्हा भाजपात प्रवेश करणार  -नरेंद्र पाटील  - Narendra Patil Reveled that he will enter Bharatiya Janata Party | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

फडणवीस सांगतील तेंव्हा भाजपात प्रवेश करणार  -नरेंद्र पाटील 

विश्वभूषण लिमये
बुधवार, 24 मार्च 2021

आपण यापुढे भाजपसाठी काम करणार असून देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश होईल, असे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे सांगितले. नरेंद्र पाटील यांनी कालच आपण शिवसेना सोडत असल्याचे जाहीर केले आहे.

सोलापूर : आपण यापुढे भाजपसाठी काम करणार असून देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश होईल, असे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे सांगितले. नरेंद्र पाटील यांनी कालच आपण शिवसेना सोडत असल्याचे जाहीर केले आहे. (Narendra Patil To Enter Bharatiya Janata Party )

नरेंद्र पाटील यांनी काल आपण शिवसेना सोडत असल्याचे जाहीर केले होते. शिवसेना सोडल्याच्या कारणांचा खुलासा पाटलांनी आज सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला. मागील सरकारच्या कालावधीतील लोकांना बाजूल सारण्याचे काम महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले. माझ्या विरोधात देखील मुख्यमंत्र्यांना भडकवण्यात महाविकास आघाडीतील नेते यशस्वी ठरले,असे नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले.  

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी मी राष्ट्रवादीत असताना देखील माझी महामंडळावर नियुक्ती केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन मी शिवसेनेकडून (Shivsena) खासदारकी लढवली. आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी करायला हवे होते. मात्र त्यांनी महामंडळ बरखास्त केले, असे स्पष्टीकरण नरेंद्र पाटील यांनी दिले. तसेच यापुढे भाजपसाठी (BJP) काम करणार असून देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश होईल असे देखील नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. 

"प्रवासात असताना योगायोगाने आपली व उदयनराजे भोसले यांची भेट झाली. राज्यातील अस्थिर वातावरण पाहता स्थिर व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा, असे मी मनमोकळेपणाने बोललो. पण पहाटेचा शपथविधी होणार की दुपारचा शपथविधी होणार हे मी सांगू शकत नाही. कोणतेही तर्कवितर्क लावायला मी काही ज्योतिषी नाही. सामान्य कार्य़कर्त्याच्या मनातील भावना मी व्यक्त केली,"असे स्पष्टीकरण नरेंद्र पाटील यांनी दिले. (Narendra Patil To Enter Bharatiya Janata Party)

दरम्यान मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला धक्का लागला. आरक्षण देण्यामध्ये शिवसेना ही भाजपसोबत होती. मात्र महाविकास आघाडीत अशोक चव्हाण यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले. मराठा समाजातील विविध संघटनानासोबत घेणे ही अशोक चव्हाणांची जबाबदारी होती. मात्र न्यायालकडून स्थगिती मिळेपर्यंत त्यांनी कोणालाही जवळ केले नाही, असे नरेंद्र पाटील म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख