मोदी म्हणतात, मी पवारांच्या बोटाला धरून राजकारण शिकलो, मग छोटे नेते कोण? 

पाटलांना कोणावर काय टीका करावी, हेच कळत नाही
Modi says I learned politics by holding Pawar's finger, then who is the little leader?
Modi says I learned politics by holding Pawar's finger, then who is the little leader?

चाकण (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर छोटे नेते म्हणून टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की, शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारण शिकलो. मग, छोटे नेते कोण? पाटलांना कोणावर काय टीका करावी, हेच कळत नाही, असा टोला आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. 

ते म्हणाले की, भाजपविरोधात मोठी नाराजी आहे, त्याचा फटका भाजपला बसणार आहे. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील काय बोलतात? कोणावर टीका करतात, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. 

आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी एकत्रितपणे, प्रामाणिकपणे काम केल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे. पदवीधर, शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणे महत्वाचे आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले. 

"केंद्राने राज्याला जीएसटीची रक्कम दिली नाही, त्यामुळे विकास खुंटतो आहे. खेड तालुक्‍यातील प्रश्न तीनही पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन सोडविले जातील. ज्येष्ठ नेते शरद पवार, पालकमंत्री अजित पवार हे तालुक्‍याला नक्की न्याय देतील,' असेही रोहित पवार म्हणाले. 

आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची ताकद मोठी आहे, त्यामुळे आपल्या उमेदवारांचे पारडे जड आहे. विरोधी उमेदवारांपेक्षा दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, त्यांना संधी द्या. कार्यकर्त्यांनी मतदान अधिक होण्यासाठी प्रयत्न करावेत. आघाडीचा धर्म सर्वांनी पाळावा.' 

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विजय डोळस, राम गावडे, कैलास सांडभोर, संध्या जाधव, गणेश सांडभोर यांची भाषणे झाली. या वेळी खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, अरुण चांभारे, बाबा राक्षे, अशोक राक्षे, विलास कातोरे, शांताराम सोनवणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी केले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश सांडभोर यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com