शिवसेना हफ्ते घेऊन काम करणारा पक्ष आहे का? - नांदगावकरांचे अनिल परबांना प्रत्युत्तर - MNS Leader Bala Nandgaonkar Answers Anil Parab's Allegation | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना हफ्ते घेऊन काम करणारा पक्ष आहे का? - नांदगावकरांचे अनिल परबांना प्रत्युत्तर

विश्वभूषण लिमये
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

मनसे हा सुपारी घेऊन काम करणारा पक्ष असेल तर शिवसेना हफ्ते घेऊन काम करणारा पक्ष आहे का, असा सवाल विचारत मनसेचे नेते   बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते अनिल परबांना प्रतिउत्तर दिले आहे.  सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतेही काम करत नाही. त्यांचे अस्तित्व त्यावरच आहे, अशा शब्दांत परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. त्याला नांदगावकर यांनी उत्तर दिले. 

सोलापूर : मनसे हा सुपारी घेऊन काम करणारा पक्ष असेल तर शिवसेना हफ्ते घेऊन काम करणारा पक्ष आहे का, असा सवाल विचारत मनसेचे नेते   बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते अनिल परबांना प्रतिउत्तर दिले आहे.  सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतेही काम करत नाही. त्यांचे अस्तित्व त्यावरच आहे, अशा शब्दांत परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. त्याला नांदगावकर यांनी उत्तर दिले. 

मनसेने वाढीव वीजबिलाविरोधात छेडलेल्या आंदोलनावरून अॅड. परब यांनी मनसेवर हल्ला चढवला होता. परब यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचाही समाचार घेतला होता. सरकार जाईल ही स्वप्न बघतच भाजपला पाच वर्षे काढायची आहेत. त्यानंतरही त्यांचा स्वप्नभंग होणार आहे. सत्तेविना ते अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्ते बिथरू नये म्हणून त्यांना हे बोलावे लागते, असे ते म्हणाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्‍तव्याचाही समाचार त्यांनी घेतला. "शरद पवार कोठे, त्यांचे कर्तृत्व कुठे आणि पडळकर कोठे? कोणावरही टीका करताना स्वत:कडे पाहावे. वयाच्या ३६ व्या वर्षी पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. हे असे बोलणारे भाजपच्या संस्कारातले नाहीत, ही भेसळ आहे. ओरिजनल भाजपमधील असे बोलणार नाहीत,"असा टोलाही त्यांनी लगावला होता.

लॉक डाऊन दरम्यान आलेल्या वाढीला वीज बिला विरोधात आज बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वामध्ये मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्याबाबत नांदगावकर म्हणाले की, मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकच मुशीत तयार झालेले असल्याने अनिल परबांनी मनसेला शिकवू नये.

ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या होत असलेल्या चौकशीबाबत नांदगावकर म्हणाले की, प्रताप सरनाईक धीरोधत्तपणे इडीच्या चौकशीला समोर जातील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना इडीची नोटीस आली होती, राज ठाकरे यांनाही ईडीची नितीश आली होती आता प्रताप सरनाईक हे धीरोधत्तपणे ईडीच्या चौकशीला समोर जातील, चौकशी होत असते याचा अर्थ गुन्हा झाला असं नाही. 
मात्र प्रताप सरनाईक यातून निर्दोष बाहेर पडतील असा विश्वास बाळा नांदगावकरांनी व्यक्त केला आहे''

दरम्यान मराठी माणसाबद्दल संजय राऊतांनी आम्हाला सांगू नये असा टोला नांदगावकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना उद्देशून लगावला. राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी भूमिका घेतली नव्हती, असे नांदगावकर म्हणाले. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे,  मात्र राज ठाकरेंनी भाजपशी  युती केली तर सैनिक म्हणून काम करणार असेही त्यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख