सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटलांचा तोल सुटतोय : हसन मुश्रीफांचा चिमटा 

गोरगरीब जनतेचा तळतळाट लागल्यानेच भाजपची सत्ता गेली.
With the loss of power, Chandrakant Patil is losing his balance: Hasan Mushrif's tweak
With the loss of power, Chandrakant Patil is losing his balance: Hasan Mushrif's tweak

मुरगूड (जि. कोल्हापूर) : गोरगरिबांना मिळणाऱ्या पेन्शन बंद करण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने आमच्या विरोधकांनी केले. त्या गोरगरीब जनतेचा तळतळाट लागल्यानेच भाजपची सत्ता गेली. त्यामुळे चंद्रकांत पाटील अस्वस्थ झाले आहेत. त्यांचा तोल गेलाय, असा टोला ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी लगावला. 

येथील प्रविणसिंह पाटील गटाने मुश्रीफ यांच्या उपस्थितीत, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार के. पी. पाटील, भैय्या माने, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, शितल फराकटे उपस्थित होत्या. 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, "मुरगूडच्या पाटील गटाने पंधरा वर्षे मला राजकारणात मदत केली आहे. त्याचे उपकार मी फेडू शकत नाही. आगामी निवडणुका त्यांच्याशी चर्चा करूनच लढवू.'' 

प्रविणसिंह पाटील म्हणाले,"कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच प्रवेश केला आहे. नजीकच्या काळात याचा निश्‍चितच फायदा होईल.'' 

के. पी. पाटील म्हणाले,"पाटील नावाचं वलय राष्ट्रवादीत विलीन झालय. हसन मुश्रीफ यांचा कार्यकर्ता हेच सर्वात मोठं पद तुम्हाला मिळालंय. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणखीन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू या.'' 

या वेळी डी. डी. चौगले, प्रा. चंद्रकांत जाधव, रमेश पाटील, सुहासिनीदेवी पाटील, नम्रता भांदीगरे, रेखा सावर्डेकर, नगरसेवक राहुल वंडकर, राजु आमते, निलेश शिंदे, विकास पाटील, वसंतराव शिंदे, संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी, सुधीर सावर्डेकर आदी उपस्थित होते. शिवानंद माळी यांनी स्वागत केले. शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. रणजितसिंह सूर्यवंशी यांनी आभार मानले. 

कोल्हापूरच्या गादीबद्दल वाद निर्माण करण्याचा प्रयत्न 


कोरोना महामारीने सरकारच्या तिजोरीतील पैसा संपलेला असताना कर्ज काढून सरकार जनतेसाठी खर्च करतंय. पैसा उपलब्ध होताच सरकार शेतकऱ्यांना पैसे देणार आहे. परंतु राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारस म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जी स्टंटबाजी सुरू आहे, अशी विक्रमसिंह घाटगे यांनी कधीही केली नव्हती, जनक घराण्याचे वारसदार म्हणून कधी डांगोराही पिटला नव्हता. हे मात्र जनक घराण्याचे वारसदार आणि गादीचे वारसदार, असा नवाच वाद निर्माण करत आहेत. अशाने कोल्हापूरच्या गादीबद्दल समाजात वाईट संदेश जाईल. त्या गादीचे पावित्र्य जपा, असे समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता भैय्या माने यांनी टोला लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com