कार्तिकी यात्रा रद्द; पंढरपुरात 25, 26 नोव्हेंबरला संचार बंदी  - Karthiki Yatra canceled; Curfew on November 25, 26 in Pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

कार्तिकी यात्रा रद्द; पंढरपुरात 25, 26 नोव्हेंबरला संचार बंदी 

भारत नागणे
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

सर्व पालख्या आणि दिंड्यांना पंढरपुरात बंदी केली आहे.

पंढरपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही सुरूच आहे. तसेच, आरोग्य विभागाने दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविल्यामुळे कार्तिकी यात्रेवर निर्बंध येणार आता स्पष्ट झाले आहे. त्यातच आता पंढरपूरमध्ये 25 ते 26 नोव्हेंबर अशी दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी आज (ता. 20 नोव्हेंबर) दिली. 

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिक यात्रादेखील प्रतिकात्मक पद्धतीने 
साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सर्व पालख्या आणि दिंड्यांना पंढरपुरात बंदी केली आहे. शिवाय 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि शहरात येणारी एसटीची प्रवासी वाहतूकदेखील बंद ठेवण्यात आली आहे. 

आषाढीनंतर कार्तिक वारी भरेल आणि त्यामध्ये विठुरायाचे दर्शन घेता येईल, असे भाविकांना वाटत होते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर दर्शनास सुरू झाले आहे. मात्र, आता कार्तिकी वारीच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये भाविकांना प्रवेश असणार नाही. हे स्पष्ट झाले आहे. सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंढरपूरमध्ये 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संचार बंदीचा प्रस्ताव पोलिस विभागाने पाठविला आहे. कार्तिकी यात्रेसाठी सतराशे अधिकारी-कर्मचारी होमगार्ड यांचा बंदोबस्त पोलिस विभागाने लावलेला आहे. तिहेरी पद्धतीचा बंदोबस्त असणार आहे . 

कार्तिकी एकादशीसाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि कोकण या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सोलापूर जिल्हा प्रशासनाने आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या प्रशासनाससुध्दा पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांना येऊ देऊ नये, याबाबत सूचना दिल्या आहेत, असेही झेंडे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख