माजी आमदार जयवंतराव जगतापांना दिलासा : संचालकपद रद्द करण्याचे अपील फेटाळले - Jayantrao Jagtap's appeal to cancel the post of director of Karmala Bazar Samiti was rejected | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार जयवंतराव जगतापांना दिलासा : संचालकपद रद्द करण्याचे अपील फेटाळले

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 जून 2021

हा नियम मला लागू होत नाही.

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे बाजार समितीचे संचालक पद रद्द करण्यात यावे; या मागणीचे केलेले अपील सहकारी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी फेटाळून लावले आहे. या निर्णयामुळे माजी आमदार जगताप यांना दिलासा मिळाला आहे. (Jayantrao Jagtap's appeal to cancel the post of director of Karmala Bazar Samiti was rejected)

येथील प्रतापराव नामदेवराव जगताप यांनी सोलापूरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे माजी आमदार जयवंतराव नामदेवराव जगताप यांचे संचालकपद बाजार समिती निवडणूक कायदा नियम 10 अन्वये रद्द करण्यात यावे, यासाठी अर्ज केला होता. त्यात प्रतापराव जगताप यांनी म्हटले होते की, माजी आमदार जयवंतराव जगताप यांना तीन मुले आहेत. त्यापैकी नारायण यांचे नावे प्लॉट आहे. तसेच, स्वत: चेअरमन असलेल्या सीतामाता मजूर संस्थेच्या नावे एक प्लॉट आहे. याशिवाय शंभूराजे यांचे नावे चार प्लॉट आहेत. पत्नी नंदिनी यांच्याही नावे एक व्यावसायिक प्लॉट आहे. त्यांनी ही माहिती निवडणुकीच्या वेळी लपवली असल्याने त्यांचे बाजार समितीचे संचालक पद रद्द करण्यात यावे. असा अर्ज प्रतापराव जगताप यांनी केला होता. 

हेही वाचा : राष्ट्रवादीचे रविराज तावरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा : हल्लेखोर चौघांना अटक 

प्रतापराव जगताप यांच्या अर्जास जयंतराव जगताप यांनी उत्तर दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे, की बाजार समितीचे जे प्लॉट आहेत, त्यातील एकही प्लॉट माझ्या व्यक्तीगत नावावर नाही. मुलांच्या नावे जे प्लॉट आहेत, ते शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेले असून त्यांचे तेथे स्वत:चे व्यवसाय आहेत. नियमानुसार मी स्वत: कोणताही प्लॉट घेतलेला नसल्यामुळे हा नियम मला लागू होत नाही, असा दावा जयंतराव जगताप यांनी केला होता. 

जगताप यांचे वकिल ॲड. कमलाकर वीर यांनी उच्च न्यायालयाचे निर्णय दाखल करून त्यात वडील किंवा मुलगा, पती किंवा पत्नी अशा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावे व्यावसायिक प्लॉट असले म्हणून कुटुंबकर्त्यास अपात्र ठरविता येणार नाही. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी प्रतापराव जगताप यांचे अपील फेटाळले आहे. प्रतापराव जगताप यांच्यातर्फे ॲड. उमेश मराठे यांनी बाजू मांडली, तर जयवंतराव जगताप यांच्यातर्फे ॲड. कमलाकर वीर यांनी काम पाहिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख