मतदार याद्या चाळत अनेक उमेदवार बांधत आहेत अंदाज

मतदान काळात आपल्या कुठल्या मित्राने, वार्डातील लोकांनी, पै पाहुण्याने दगा दिला व एवढे सारे करूनही आपल्या म्हणण्याला कोणी ठेंगा दाखवला यांच्या हिशेबाची सुरुवात झाली आहे. कोणत्या वॉर्डातुन कोण निवडून येणार, कोण हरणार व स्टार कोण होणार. हे सोमवारी स्पष्ट होणार आहे
Leaders Anxious about Grampanchayt Election Results
Leaders Anxious about Grampanchayt Election Results

पेड (जि. सांगली)  : पेड परिसरातील ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी चुरशीचे मतदान झाले असुन सदस्य होऊ इच्छिणाऱ्याचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. वॉर्ड वार झालेल्या मतदानाची आकडेवारी मिळवत गोळा बेरीज सुरु ठेवली आहे. मतमोजणी सोमवारी तासगांव येथे होणार आहे. मात्र निकाल लागेपर्यत नेते मंडळीनी शुक्रवारी मतदान झाल्या पासून मतदार याद्या चाळत कोणकोणत्या लोकांनी मतदान केले यांचा अंदाज बांधत आहेत.

मतदान काळात आपल्या कुठल्या मित्राने, वार्डातील लोकांनी, पै पाहुण्याने दगा दिला व एवढे सारे करूनही आपल्या म्हणण्याला कोणी ठेंगा दाखवला यांच्या हिशेबाची सुरुवात झाली आहे. कोणत्या वॉर्डातुन कोण निवडून येणार, कोण हरणार व स्टार कोण होणार. हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणावा तसा अवधी न मिळाल्यामुळे भपकेबाज प्रचार झालाच नाही .

यावेळी इच्छुकांची यादी फुगल्यामुळे व त्यातच उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजीचे प्रमाण वाढले. त्यातून मतविभागणी झाली आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे अमुकच एखाद्या गटाचा निवडून येणारा हुकमी उमेदवार हमखास असला तरी त्यांच्या मतामध्ये विभाजन होणार हे तितकेच खरे आहे . शिवाय इतरवेळी मोठया मताधिक्कयाने निवडून येणाऱ्या उमेदवाराला सर्वाधिक फटका बसणार आहे.

नेहमी प्रमाणे शेवटच्या दोन दिवसात राजकीय नेतेमंडळीनी अंदाज घेत आपल्या गटाच्या कार्याची जनजागृती केली. शुक्रवारी मतदानाच्या दरम्यान प्रत्येक उमेदवारांकडून प्रत्येक कार्यकर्त्यासह मतदारावर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. कोणत्याही परिस्थीतीत आपल्याल्याच पक्षाच्या पँनेलची सत्ता यावी व सर्वाधीक उमेदवार विजयी व्हावेत यासाठी शुक्रवारी अगदी सकाळी मतदान वेळेपासून गावातील प्रमुख नेते मंडळी मतदारांची भेट घेऊन आपल्याच गटाला मतदान करण्याचे आवाहन करत होते. तसेच सकाळ पासून सर्वच बूथवरील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढतच गेला. दुपारी १२ वाजेपर्यत सर्वसाधारणपणे ४० ते ४५ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानात मोठया प्रमाणात वाढ झाली. एकंदरीत यावेळी इच्छुकांची संख्या वाढल्याने सर्वच गावातील वार्डामध्ये सुरुवातीपासून चुरस दिसुन आली.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com