गोपीचंद पडळकर समर्थकांचे २४ तासांत उत्तर

त्यानंतर त्यांनी कार्यालयावर दगड फेकून पडळकर यांच्या समर्थनाच्या घोषणाही दिल्या.
Gopichand Padalkar supporters attack NCP office in Solapur
Gopichand Padalkar supporters attack NCP office in Solapur

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी (ता. ३० जून) सायंकाळी सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज (ता. १ जुलै) पडळकर समर्थकांनी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. (Gopichand Padalkar supporters attack NCP office in Solapur)

पडळकर हे घोंगडी बैठकांच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात आहेत. बुधवारी सायंकाळी मड्डी वस्ती परिसरातील बैठक संपवून जात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात तरुणाने दगड फेकला. तत्पूर्वी काल सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पडळकर यांनी शरद पवार यांना आपण मोठा नेता मानत नाही. राष्ट्रवादी ही साडेतीन जिल्ह्यापुरती मर्यादीत आहे, अशी टीका केली होती. तसेच पवारांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी राष्ट्रवादीकडेच अंगुलीनिर्देश केले होते.

दरम्यान, पडळकरांवरील हल्यानंतर आज त्यांच्या समर्थकांनी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला. दोन तरुणांनी दगडाच्या साहाय्याने खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी कार्यालयावर दगड फेकून पडळकर यांच्या समर्थनाच्या घोषणाही दिल्या. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या दोन तरुणांची नावे शरणू हांडे आणि सोमनाथ घोडके अशी आहेत. ते दोघेही स्वतःहून पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला केला. आम्ही पळून न जाता पोलिस ठाण्यात जात आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकणाऱ्या पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही, म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला करून आम्ही निषेध नोंदविला आहे, असेही ते म्हणाले.
 
अमोल मिटकरींचा पडळकरांवर आरोप

विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी (ता. ३० जून) सोलापुरात जो हल्ला झाला आहे, तो भारतीय जनता पक्षाने ठरवून केलेला स्टंट आहे. पत्रकारांशी बोलताना आज (ता. १ जुलै) आमदार पडळकर म्हणाले की हा हल्ला उपेक्षित, दलित, शोषित आणि वंचित वर्गाचा आवाज दाबण्यासाठी हल्ला केला आहे. हा उपेक्षित वर्ग ४० ते ५० लाख रुपयांच्या गाड्या घेऊन फिरत नसतो.

ही प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाकडूनच आलेली आहे. तो एक पब्लिसिटी स्टंट आहे. हा जो दगडहल्ला झाला, त्यामुळे आपल्याला झेड किंवा वाय प्लस सुरक्षा भेटेल. यासाठी गोपीचंद पडळकर यांनी केलेले हे सुनियोजित कटकारस्थान आहे. राज्यातील जनतेला हा सर्व प्रकार माहीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांच्यावर हल्याप्रकरणी केला आहे. 

आमदार मिटकरी म्हणाले की, आज जागतिक कृषी दिन आहे. त्यानिमित्ताने गोपीचंद पडळकर यांना माझे सांगणे आहे की, शेतकऱ्यांसाठी बांधावर जाण्याचा जरा प्रामाणिक प्रयत्न करा. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रासाठी जे देणं दिलं आहे, त्याचा प्रचार करा.

माणमाणसांमध्ये भांडणे लावून तुमची आरएसएसची मानसिक विकृती जगासमोर आणू नका. अन्यथा भारतीय जनता पक्षाला तोंड काळं करावे लागेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षानेसुद्धा अशा लोकांपासून सावध असावे, असा सल्लाही आमदार मिटकरी यांना भाजपला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com