भालकेंना धक्का : पहिल्या फेरीतच भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर - In the first round, BJP candidate Samadhan Avtade is leading | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

भालकेंना धक्का : पहिल्या फेरीतच भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

भारत नागणे
रविवार, 2 मे 2021

त्यांना धक्का मानला जात आहे.

पंढरपूर : अत्यंत चुरशीने पार पडलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पहिल्या फेरीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी ४५० मतांची आघाडी घेतली आहे. आवताडे यांन पहिल्या फेरीत २८४४ मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके हे पहिल्याच फेरीत पिछाडीवर पडले आहेत. त्यांना २४९४ मते मिळाली आहेत. हे सुरुवातीचे कल असेली तरी सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार आवातडे यांनी आघाडी घेतली आहे. 
दरम्यान, ही पहिली फेरीत पंढरपूर तालुक्यातील मतांची मोजणी करण्यात आहे. पंढरपूरमध्ये भालके यांना आघाडीची अपेक्षा असताना भालके यांच्या गृहतालुक्यातच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतल्याने त्यांना धक्का मानला जात आहे.

पंढरपुरात रविवारी (ता. 2 मे) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात झाली. एकूण 14 टेबलवरून 38 फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जात आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी उशिर लागण्याची शक्यता आहे. येथील शासकीय धान्य गोदामात पोलिस बंदोबस्तात ही सारी प्रक्रिया पार पडत आहेत. पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी करण्यात आली आहे.  

या निवडणुकीत एकूण  2 लाख 34 हजार मतदारांनी 17 एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीसाठी 160 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेले आहेत. मतमोजणी केंद्रात येणार्या मतमोजणी प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. शिवाय 50 टक्के मतमोजणी प्रतिनिधींसाठी पीपीई कीट देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राजवळ जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

 राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 17 एप्रिल रोजी मतदान झाले. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना तर भाजपकडून उद्योगपती समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी आणि भाजपकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. आवताडे आणि भालके समर्थकांनी विजयाचा दावा केला असला तरी दोन्ही उमेदवारांच्या मतांत फारसा फरक राहणार नाही, पाच ते दहा हजाराच्या मताधिक्याने उमेदवार विजयी होईल, असाही अंदाज दोन्ही बाजूंनी व्यक्त होत आहे. अवताडे यांच्यासाठी प्रशांत परिचारकांना जोरात काम केले. त्यामुळे पंढरपुरात त्यांना चांगली साथ मिळेल, असे सांगण्यात येते. तसेच राष्ट्रवादीला स्वाभिमानीच्या उमेदवारीचा फटका बसणार की सोय होणार, याबाबत दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होत आहेत. स्वाभिमानीची मते भाजपला जाऊ नये यासाठी राजू शेट्टी यांनी उमेदवार उभा केला, असे राष्ट्रवादीचे समर्थक सांगतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख