माजी आमदार राजू आवळे राष्ट्रवादीत; अजितदादांच्या उपस्थितीत होणार प्रवेश - Ex Mla Raju Awale to enter NCP in presence of Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार राजू आवळे राष्ट्रवादीत; अजितदादांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

सुनील पाटील
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मी मुंबईत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. त्यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन. या निर्णयाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजू आवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

कोल्हापूर  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मी मुंबईत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. त्यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन. या निर्णयाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजू आवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी आमदार आवळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची चर्चा सोशल मीडियातूनरंगली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगरसेवक अब्राहम आवळे यावेळी उपस्थित होते. माजी आमदार आवळे यांच्यासह पेठवडगावच्या माजीनगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. 

त्यानंतर आपण आपल्या कार्यकर्त्यांचा एक व्यापक मेळावा घेणार असून प्रांतिक उपाध्यक्षा प्रविता सालपे व सदस्य मदन कारंडे यांचे सहकार्य मिळत असल्याचे श्री. आवळे यांनीया वेळी सांगितले. इचलकरंजीत राष्ट्रवादीमध्ये कारंडे व जांभळे अशा दोन भरभक्कम गटात राष्ट्रवादी काँग्रेस विभागली आहे. या संदर्भात विचारल्यानंतर आवळे यांनी दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी 
प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख