मनसे कार्यकर्त्यांचे इंजिन या गावातच धावले

पंचवीस वर्षाच्या शिवसेनेच्या सत्येला मनसेने अंकुश लावला आहे. जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायत येथे मनसेने मोठा विजय मिळवला आहे.
 Raj Thackeray jpg
Raj Thackeray jpg

बुलडाणा : पंचवीस वर्षाच्या शिवसेनेच्या सत्तेला मनसेने अंकुश लावला आहे. जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायत येथे मनसेने मोठा विजय मिळवला आहे. 

जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या जिगाव ग्रामपंचायतीमध्ये मनसेने इतिहास घडवला आहे. तब्बल पंचवीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत मनसेने खेचून आणली आहे. ग्रामपंचायतीत तब्बल नऊपैकी सात जागांवर मनसेने दणदणीत विजय मिळवला आहे. 

निवडणुकीत मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाची असलेली जिगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेने पंचवीस वर्ष एकहाती संत्ता राखली होती. मात्र, यंदा शिवसेनेच्या पॅनला धोबीपछाड देत मनसेने बाजी मारली आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे जिवगाव मधील हा विजय मनसेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 


रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांना मोठा धक्का...प्रस्थापितांना डावलून नव्या चेहऱ्याना संधी
 
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन विधान सभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निकालात दानवे यांना मोठा धक्का बसला आहे. 

भोकरदन तालुक्यातील प्रस्थापित ग्रामपंचयातीत दानवे यांच्या समर्थकांनी मोठा धक्का बसला आहे. 12 फेऱ्या अंती जवळपास  ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहे, यांत पारध, वाळसावनगी ,सिपोरा बाजर, केदारखेडा, जळगाव सपकाळ, आव्हान, या मोठ्या ग्रामपचायतीत दानवे यांच्या समर्थकांना डावलून जनतेने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे आपल्या बालेकिल्ल्यातच दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय 

सगळ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या हिवरे बाजार आदर्श गावच्या निवडणुकीत पोपटराव पवारांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलने सर्व सातही जागा जिंकत ग्रामपंचायतवर पुन्हा एकादा वर्चस्व राखले आहे. सलग गेल्या ३०  वर्षापासून बिनविरोध निवडणुका होत असलेल्या या गावात 30 वर्षांनी निवडणूक लागली होती. त्यामुळे या गावात काय निकाल लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 

गेल्या 30 वर्षामध्ये प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा आणि गावकऱ्यांच्या श्रमदानाचा हा विजय असल्याचे पोपटराव पवार यांच्या पुतण्याने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गेल्या 30 वर्षाच्या बिनविरोध निवडणुकांची परंपरा काही लोकांच्या हट्टामुळे खंडीत झाली असली तरी लोकांनी पोपटराव पवारांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचंही त्यांनी प्रसारमाध्य्मांशी बोलताना सांगितलं.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com