अकलूजमध्ये मोहिते पाटलांनी गड जिंकला पण सिंह गमावला

आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील गटाने आपली सत्ता कायम राखली आहे. मात्र, पुतण्याच्या पराभवामुळे मोहिते पाटील गटाची अवस्था गड जिंकला पण सिंह गमावला, अशी झाली आहे.
Vijaysinh Mohite - Sangramsinh Mohite
Vijaysinh Mohite - Sangramsinh Mohite

अकलूज : आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील गटाने आपली सत्ता कायम राखली आहे.  एकूण १७ पैकी १४ जागांवर विजय मिळवत  एक हाती सत्ता राखली आहे. मात्र, पुतण्याच्या पराभवामुळे मोहिते पाटील गटाची अवस्था गड जिंकला पण सिंह गमावला, अशी झाली आहे. 

अकलूज ग्रामपंचायती च्या निवडणूकीत मोठी चुरस होती. विरोधी डाॅ धवलसिंह पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आवाहन उभे केले होते.निवडणुकीत डाॅ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे येथील निकालाकडे राज्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निकालानंतर अकलूज करांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त करत पुन्हा सत्ता दिली आहे.


तरीही डाॅ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने वार्ड क्रमांक तीन मधून ज्योती कुंभार आणि गिरीराज माने देशमुख यांनी विजय मिळवला आहे. येथे जयसिंह मोहिते पाटील याचे पुत्र संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायक परावभव केला आहे. संग्रामसिंह यांचा पराभव मोहिते पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशीच काहीसी स्थिती विजयसिंह मोहिते पाटील गटाची झाली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मतमोजणी केंद्रावर , जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलून गुलाल उधळणाऱ्या अति उत्साही करकर्त्यांना पोलिसांनी चोप दिलाय.
वारंवार ध्वनिक्षेपकावरून  पोलिसांनी समक्ष सांगूनही केंद्राच्या आवारात गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चोप दिलाय.

उस्मानाबादमध्ये भाजप पिछाडीवर
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या निवडणुका घेण्यात आल्या त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ही पहिल्या आणि दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आलेले आहेत,  यामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे,  तर भाजपा उस्मानाबाद जिल्ह्यात पिछाडीवर असल्याचं चित्र पहायला मिळतं आहे,  मात्र संध्याकाळपर्यंत संपूर्ण चित्र समोर येईल, 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com