जयंत पाटलांच्या सासुरवाडीत राष्ट्रवादीला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मिरज तालुक्यातील सासुरवाडी म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला दणका बसला असूनजयंत पाटील यांचे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या सत्ताधारी पॅनलचा पराभव झाला आहे.
Jayant Patil NCP
Jayant Patil NCP

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मिरज तालुक्यातील सासुरवाडी म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला दणका बसला असून जयंत पाटील यांचे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या सत्ताधारी पॅनलचा पराभव झाला आहे. 

ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १५ जागांवर भाजपा गटाचा विजय झाला असून राष्ट्रवादीच्या मनोज शिंदे यांच्या गटाला २ जागा मिळाल्या आहेत. जागा विद्यमान सरपंच मनोरमा शिंदे- म्हैसाळकर ,त्यांची मुलगी व मनोज शिंदे यांच्या बंधूंचा पराभव झाला आहे. 

तासगाव तालुक्यातील सावळज ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून ग्रामपंचायतील राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. आधी ही ग्रामपंचायत भाजपकडे होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी १४  तर  भाजप ३ जागांवर विजयी झाले आहेत.

खानापूर तालुक्यात शिवसेना आमदार अनिल बाबर गटाची सरशी झाली आहे. १३ पैकी नऊ ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आली आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाकडे २, जेष्ठ नेते रामराव दादा पाटील गटाकडे १, व युवक नेते सुहास शिंदे गटाकडे १ ग्रामपंचायत आली आहे. पारे, नागेवाडी, माहुली, देवींखिंडी, रेणावी या मोठया ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. 

वळसंग ग्रामपंचायत निकाल 
भाजप-4
काँग्रेस-4
राष्ट्रवादी-1

उमराणी ग्रामपंचायत सत्तांतर , भाजप 12 काँग्रेस 4 जागांवर 

गुगवाड  ग्रामपंचायत काँग्रेसची बाजी  -
8 जागा काँगेस
भाजप 3 जागा 

येलदरी ग्रामपंचायत काँग्रेसची सत्ता
काँग्रेस - 6
भाजप 3
सत्ता काँग्रेस

शेगाव ग्रामपंचायत भाजपाची सत्ता
भाजपा 12 
काँग्रेस  1 जागेवर विजयी.

उटगी ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर भाजप विजयी 
13 जागा भाजपा.
काँग्रेस -0

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com