पदवीधरच्या निवडणुकीत जाणवली भारत भालकेंच्या दमदार भाषणाची उणीव 

विरोधकांनी केलेल्या टीकेला सहजासहजी उत्तर देण्यात ते माहीर होते.
Bharat Bhalke's speech missed in graduate constituency election
Bharat Bhalke's speech missed in graduate constituency election

मंगळवेढा : शालेय शिक्षण कमी असले तरी राजकीय ज्ञानात पारंगत असलेले आमदार (स्व.) भारत भालके यांच्या ग्रामीण ढंगाच्या दमदार भाषणाची उणीव पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात प्रकर्षाने जाणवली. 

विधानसभेच्या 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत आमदार भालके हे स्वतः स्टार प्रचारक होते. विरोधकांनी केलेल्या टीकेला सहजासहजी उत्तर देण्यात ते माहीर होते.

पुणे पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे आजतागायत वर्चस्व होते. परंतु ही जागा हिसकावून घेण्याचा दृष्टीने महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अरुण लाड यांना उमेदवारी दिली. दोन्ही उमेदवार हे एका जिल्ह्यातील असून दोन्ही पक्षाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. 

मंगळवेढ्यातील प्रचाराची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी या अर्थाने आमदार भारत भालके यांच्यावर होती. पण, ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या आजारपणाने डोके वर काढले. त्यामुळे ते या निवडणुकीच्या रणधुमाळीत सहभागी होऊ शकले नाहीत. पण, महिनाभरापूर्वी सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामधारी उपमुख्यमंत्री म्हणत टीका केली होती. त्या टीकेला आमदार भालके यांनी जहाल भाषा वापरत उत्तर दिले होते. 

पदवीधर निवडणुकीच्या आखाड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी,"शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीकडून पदवीधरच्या निवडणुकीत बोगस मतदान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जागरुकपणे काम करावे' अशी सूचना मंगळवेढ्यात दिली होती. त्यांच्या या आरोपाला राष्ट्रवादीकडून फारसे गांभीर्याने घेतले नाही. मात्र, या आरोपाचा समाचार सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आला. 

दरम्यानच्या काळात आमदार भालके यांच्या निधनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रचार यंत्रणा थांबली. पण, अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस लतीफ तांबोळी यांनी प्रचार धुरा स्वःताच्या खांद्यावर घेऊन प्रचार यंत्रणा राबवली.

त्यांना रामभाऊ वाकडे, मागासवर्गीय सेलचे विजय खवतोडे, महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, जिल्हा सरचिटणीस भारत बेदरे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड नंदकुमार पवार, शिवसेना तालुकाध्यक्ष तुकाराम कुदळे, मारुती वाकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजम्मील काझी, सुनील दत्तू, संदीप फडतरे, संदीप बुरकुल, संगीता कट्टे, पंडीत गवळी, आप्पा चोपडे, अशोक माने, प्रवीण गोवे, अजिंक्‍य जावळे आदींनी सहकार्य केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com