बच्चूभाऊ, फक्त कृषी खातंच नाही, तर संपूर्ण सरकार झोपलं आहे 

"बच्चू भाऊ, राज्यातील कृषी खातंच नाही, तर संपूर्ण सरकार झोपलं आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे,' असे भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार राम सातपुते यांनी राज्य मंत्री बच्चू कडू यांना उद्देशून म्हटले आहे.
Bachubhau, not only the agriculture department, but the entire government is asleep
Bachubhau, not only the agriculture department, but the entire government is asleep

पुणे : "बच्चू भाऊ, राज्यातील कृषी खातंच नाही, तर संपूर्ण सरकार झोपलं आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे,' असे भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार राम सातपुते यांनी राज्य मंत्री बच्चू कडू यांना उद्देशून म्हटले आहे. 

राज्य मंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना "राज्यातील कृषी खातं झोपलं आहे काय?' असा सवाल उपस्थित केला होता. "महाबीजवाले बाजारातील बियाणे विकतात. एकही वर्ष अस गेलं नाही की शेतकऱ्यांना चांगलं बियाणं मिळालं नाही. बेकार बियाणं विकणाऱ्या मालकांना आता चोपलं पाहिजे,' असं वक्तव्य राज्य मंत्री कडू यांनी केले होते. 

राज्यमंत्री कडू यांच्या या वक्तव्यावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले आहे. बच्चू कडू यांचा व्हिडिओ पोस्ट करत सातपुते यांनी म्हटले आहे की "राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय, अशी स्थिती आहे, असा प्रश्‍न राज्य मंत्री बच्चू कडू यांनी विचारला आहे.' 

सातपुते पुढे म्हणतात की, मंत्री महोदय साहेब, फक्त कृषी खातंच नाही हो, संपूर्ण सरकारच झोपलं आहे. युरियाचा काळा बाजार सुरू आहे. दुधाला भाव मिळत नाही. साहेब हे कर्मदरिद्री सरकार शेतकरी विरोधी आहे, यात तीळमात्र शंका नाही,' अशा शब्दांत युवा आमदार सातपुते यांनी राज्य सरकारवर हल्लोबोल केला आहे. 

आमदार सातपुते यांनी बच्चू कडू यांनी कृषी खात्याबद्दल केलेल्या विधानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबाबत भाष्य केले आहे. त्यात बच्चू कडू म्हणतात की "या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना घायल करून टाकले आहे. पेरलं तेव्हा निघालं नाही आणि हातात आलं तेव्हा मारून टाकलं आहे. मला वाटतं राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय अशी अवस्था आहे.' 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची फॅमिली टूर; कोरोना रुग्णांची बेडसाठी धावपळ 

जळगाव : "महाजनजी, आमच्या रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे, त्याला नाशिकमध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये एका बेडची व्यवस्था करून द्या हो!' अशी विनंती करणारे फोन नाशिक येथून येत असतात. आपण शक्‍य तितके प्रयत्न करून त्यांना सहकार्य करतो. परंतु राज्यात कोरोना रुग्णांची अत्यंत विदारक स्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फॅमिली टूरमध्ये व्यस्त आहे, तर कोरोनाचे रुग्ण एका बेडसाठी धावाधाव करीत आहेत. कठीण आहे बाबा, कसे होईल? अशी चिंता राज्याचे माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. 

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करून महाजन म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूही वाढत आहे. परंतु सरकार आणि त्यांचे मंत्रीही लक्ष देत नाहीत. काय चालले आहे राज्यात, हेच कळेनासे झालेले आहे. बरं टीका केल्यानंतरही सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांना काहीच वाटत नाही. त्यांची कातडी आता सत्तेमुळे गेंड्यांची झाली आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com