आशिष शेलारांची सासूरवाडीत कॉलर टाईट  - Ashish Shelar won Sasurwadi Gram Panchayat | Politics Marathi News - Sarkarnama

आशिष शेलारांची सासूरवाडीत कॉलर टाईट 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश मिळाले. दांडेली हे गाव भाजपचे नेते तथा आमदार अँड आशिष शेलार यांची सासूरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेनेकडे होती. 

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश मिळाले. दांडेली हे गाव भाजपचे नेते तथा आमदार अँड आशिष शेलार यांची सासूरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेनेकडे होती. 

या निवडणुकीत मात्र, ही ग्रामपंचायत भाजपने खेचून आणली आहे. भाजप नेते आशिष शेलार स्वत: या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

रत्नागिरीतील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील 1492 उमेदवारांपैकी भाजपाचे 536 ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले, असल्याचे शेलार यांनी म्हटले आहेत. तर, सिंधुदुर्गात भाजपाचाच आवाज! कोकण म्हणजे "आम्हीच" म्हणणाऱ्यांचे कोकणी माणसाकडून गर्वहरण! असा टोला शिवसेनेला लगावला आहे. 

शेलार यांनी टि्वटरमध्ये म्हटले आहे की, रत्नागिरीतील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील 1492 उमेदवारांपैकी भाजपाचे 536 ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले. तर 59 गावात भाजपाचे सरपंच बसणार! रत्नागिरीतही घवघवीत यश! शिवसेनेचा आभासी फुगा फुटला, कोकणात भगवा फडकला, पण तो भाजपाचा!!

कणकवली विधानसभा 39 पैकी 27 तर सावंतवाडी 16 पैकी 9 तसेच कुडाळ 15 पैकी 9  अशा एकुण 70 पैकी भाजपाने 45 ग्रामपंचायती जिंकल्या तर सेनेला केवळ 20 आणि राष्ट्रवादीला 1 ग्रामपंचायत जिंकता आली. सिंधुदुर्गात भाजपाचाच आवाज! कोकण म्हणजे "आम्हीच" म्हणणाऱ्यांचे कोकणी माणसाकडून गर्वहरण! शेलार यांनी असे टि्वट करत शिवसेनेवर टीका केली आहे. 

कोकणात, नारायण राणे यांचं अस्तित्व कधीच संपलं!

नाशिक : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मला बोलण्यात अजिबात स्वारस्य नाही. कारण त्यांनी तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते. कोकणातील जनतेने त्यांना केव्हाच त्यांची जागा दाखवली आहे. कोकणात त्यांचे अस्तित्व कधीच संपलं, असे शिवसेना नेते, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सांगितले. 

जाधव यांनी आज नाशिकचा खासगी दौरा केला. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेला ग्रामीण भागात मोठा जनाधार आहे. ते भाजपची संस्कृती विसरून बेछूट आरोप करताय हे चुकीचं आहे.  शरद पवार यांच्याविषयीचे वक्तव्य हा भाजपचा बेशरमपणा आहे. हे असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते करताय हे अत्यंत अयोग्य आहे. 

राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही....  

सिंधुदुर्ग : "सिंधुदुर्गात राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही  आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व पाहता येथील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या बिलांचे समर्थन जिल्ह्यातील जनता करत आहे. हेही दाखवून दिले आहेत. तर आता पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँक यात देखील सत्ता देखील आमचीच असणार आहेत आणि विरोधक हद्दपार होणार आहेत ही काळ्यादगडावरची रेघ आहे," असे व्यक्तव्य करत भाजपचे नेते नितेश राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख