पंढरपुरातील ‘वसूलदार वाझे’ची डीपीडीसीवर निवड; परिचारकांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

पंढरपुरातून डीपीडीसीवर गेलेला वादग्रस्त वाझे कोण याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Appointment of a controversial activist from Pandharpur on DPDC has created a stir in the political arena
Appointment of a controversial activist from Pandharpur on DPDC has created a stir in the political arena

पंढरपूर : सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या 14 जणांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांबरोबरच तीनही पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. पंढरपुरातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्यासह आणखी एकाची निवड करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. त्या कार्यकर्त्याच्या नावाच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. (The appointment of a controversial activist from Pandharpur on DPDC has created a stir in the political arena)

याच दरम्यान भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी डीपीडीसी सदस्य निवडीवरुन राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. दोन दिवसांपासून  जिल्ह्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आलेल्या त्या कार्यकर्त्याचा नामोल्लेख न करता थेट वसूलदार वाझे असा उल्लेख करत राष्ट्रवादीची खिल्ली उडवली. आमदार परिचारकांच्या या वक्तव्यानंतर पंढरपुरातून डीपीडीसीवर गेलेला वादग्रस्त वाझे कोण याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

ओबीसी आरक्षण मागणीसाठी शनिवारी (ता. 26 जून) पंढरपुरात भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान भाषणात आमदार परिचारक म्हणाले की, आम्ही राजे आणि गावोगावी आमचे वाझे असं हे राज्य सरकारचं काम आहे. त्यातूनच गावोगावी अनेक वाझे  तयार केले आहेत. आता तर पंढरपुरातूनही एक वाझे जिल्हा नियोजन समितीवर गेल्याची चर्चा सुरु आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेत आलेला पंढरपुरातील तो वसूलदार वाझे कोण याविषयी आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळेंचे समर्थक  नाराज

जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी, यासाठी सोलपूर जिल्ह्यातील  राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी व प्रमाणिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. नुकतेच भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या कल्याणराव काळे यांनीही प्रयत्न केले. पण, त्यांनाही डावल्यात आले. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांची किमान डीपीडीसीवर निवड करुन राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी कार्यकर्त्यांना आशा होती. पण, विधानसभेला पराभूत झालेल्या भगिरथ भालके यांच्याबरोबरच तालुक्यातील आणखी एकाला डीपीडीसीवर संधी दिल्याची चर्चा आहे. 

राजकीय नेत्यांच्या मागे-पुढे आणि त्यांची खासगी कामे करणाऱ्या (राजकीयदृष्ट्या अत्यंत कमी महत्व असलेल्या) एकाची अनपेक्षितपणे  निवड केल्याची चर्चा सुरु आहे. त्याच्या या निवडीवरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्था निर्माण झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे थेट तक्रार केल्याची चर्चा आहे. 

संबंधीत कार्यकर्त्याचे नाव ऐकल्यानंतर (खासगीत) अनेकांनी आश्चर्य  व्यक्त केले. नेत्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांनाच पदे आणि प्रतिष्ठा मिळते. प्रामाणिक कार्यकर्त्यांची माती होते, अशी बोलकी आणि तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका निष्ठावंत जाणकार कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. अशातच भाजप आमदार प्रशांत परिचारकांनीही भरसभेत त्या कार्यकर्त्याचा वसूलदार वाझे असा उल्लेख केल्याने त्याची ही निवड आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com