विधानसभेला तौफिक शेख यांची झाली होती मदत; प्रणिती शिंदेचा गौप्यस्फोट - Taoufiq Shaikh Helped me in Election Claims Praniti Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

विधानसभेला तौफिक शेख यांची झाली होती मदत; प्रणिती शिंदेचा गौप्यस्फोट

विश्वभूषण लिमये
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

तौफिक शेख यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात २०१४ ची निवडणूक 'एमआयएम' कडून लढत कडवी टक्कर दिली होती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तौफिक शेख यांनी मला मदत केली होती असं विधान काँग्रेस कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणाला आता वेगळच वळण मिळालं आहे. 

सोलापूर : विधानसभेसाठी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना कडवी टक्कर देणारे 'एमआयएम'चे तेव्हाचे नेते तौफिक शेख यांनी गेल्या विधानसभेला मला मदत केली होती, असे विधान शिंदे यांनी केल्याने सोलापूरच्या राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

सोलापूरमध्ये 'एमआयएम' चे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढवली आहे. त्यांच्या समर्थक नगरसेवकांना घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. 

तौफिक शेख यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात २०१४ ची निवडणूक 'एमआयएम' कडून लढत कडवी टक्कर दिली होती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तौफिक शेख यांनी मला मदत केली होती असं विधान काँग्रेस कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणाला आता वेगळच वळण मिळालं आहे. 

'एमआयएम' मधील नाराज तौफिक शेख यांनी शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या विरुद्ध उघड नाराजी व्यक्त करत 'एमआयएम' ला सोडचिट्टी दिली,. तौफिक शेख हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आहेत.  त्यामुळे आता प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या  एकेकाळचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या तौफिक शेख यांची मदत विधानसभा निवडणुकीत झाली असं विधानसभा करून सोलापूरच्या राजकारणाला एक नव वळण दिलं आहे.

अवघ्या एका वर्षावर सोलापूर महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना भविष्यात प्रणिती शिंदे आणि फारुख शाब्दी एकत्र तर येणार नाहीत ना, अशा चर्चांना उत आला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख