खासदार प्रतापराव जाधवांच्या जन्मगावी 'स्वाभिनानी' च्या शिट्या!

बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे जन्मगाव असलेल्या मादणी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत चौरंगी लढती होत आहेत. या गावात चार पॅनेल असून स्वाभिमानीचे उमेदवार नीतिन अग्रवाल हे एकटेच उघडपणे प्रचार करत आहेत
Swambhimani Blosing Whistle in Buldana MP Pratap Jadhav's Home Village
Swambhimani Blosing Whistle in Buldana MP Pratap Jadhav's Home Village

बुलडाणा : बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे जन्मगाव असलेल्या मादणी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत चौरंगी लढती होत आहेत. या गावात चार पॅनेल असून स्वाभिमानीचे उमेदवार नीतिन अग्रवाल हे एकटेच उघडपणे प्रचार करत आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह शिट्टी असून गावात आता त्यांच्या शिट्टीचा आवाज घुमत आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांचे मादनी हे गांव बुलडाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यात आहे. तेथे ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. गावात चार पॅनेल असली तरीही केवळ एकाच पॅनेलचा प्रचार सुरु असून उमेदवारही घराबाहेर निघत नाहीत, असे चित्र आहे. ग्रामस्थ सुद्धा प्रचारात दिसत नाहीत.

या निवडणुकीत आपलंगांव आपला विकास पॅनल, जनविकास पॅनल, ग्रामविकास पॅनल आणि ग्रामसेवा एकता पॅनल अशा चार पॅनलचे उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीत नऊ सदस्य पाठवायचे आहेत. या नऊ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

विद्यमान खासदारांच्या विरोधात कोण जाईल, अशी भीती उमेदवारांमध्ये असल्याची चर्चा आहे. या साऱ्या धामधुमीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नीतिन अग्रवाल हे फक्त उघडपणे प्रचार करत आहेत. त्यांनी आपले निवडणूक चिन्ह असलेल्या शिट्ट्या गावातल्या मुलांना वाटल्या आहेत. ही मुळे शिट्टया वाजवत गावात फिरत असल्याने गावात फक्त स्वाभीमानीची शिट्टी वाजली, अशी गमतीदार चर्चा सुरु असताना दिसते. या शिट्ट्या सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आता चार पॅनेलमध्ये बाजी कोण मारणार, खासदारांच्या विरोधात कोण जाणार आणि मुख्य म्हणजे स्वाभीमानीची शिट्टी वाजणार की बंद पडणार, यासाठी १८ तारखेपर्यंत थांबावे लागणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com