खडसेंसारखा उत्तर महाराष्ट्रातला दिग्गज नेता भाजपने संपविला : गुलाबराव पाटील       - Shivsena Minister From Jalgaon Talks About BJP and Ekanath Khadase | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंसारखा उत्तर महाराष्ट्रातला दिग्गज नेता भाजपने संपविला : गुलाबराव पाटील      

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. त्यांना भाजपने संपविले आहे. त्यांनी आता केवळ बोलून थांबू नये तर आरपारची लढाई करावी, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.   

जळगाव : एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. त्यांना भाजपने संपविले आहे. त्यांनी आता केवळ बोलून थांबू नये तर आरपारची लढाई करावी, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.   

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टिका टिप्पणी करू शकत नाही. कारण आम्ही (देवेंद्र) सर्व तत्त्व, सत्व विसरून चार दिवसांचा संसार केला आहे. मुहूर्त साधला, लग्न केले, मुख्यमंत्री, उप मुख्य मंत्रिपदाची शपथ घेतली. तीन, चार दिवस एकत्र राहिलो. चार दिवस दुसऱ्यांच्या घरात राहून तुम्ही पतिव्रता कसे राहू शकतात? टीकाटिप्पणी करू शकत नाही. कारण तुम्ही नैतिकता हरविली आहे, असा आरोप करत काही दिवसांपूर्वी  माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली होती.

''माझ्यावर नको ते आरोप करून मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. यामागे मोठे षडयंत्र आहे. माझ्यावर दाउद इब्राहिमबाबत नाहक आरोप केले गेले. हॅकर मनीष भंगाळेला देवेंद्रजी भेटले होते. याबाबत त्यांना विचारल्यावर तो भेटायला आला म्हणून भेटलो, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. कोणीही माझ्यावर आरेाप करायचे. चार, पाच दिवस टीव्हीवर ते चालवायचे, असे षडयंत्र होते. माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी षडयंत्र कोणी रचले. कोण कोणाशी भेटले, कोणी फोन केले, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आलेले आहेत,'' असेही खडसे म्हणाले होते.                

याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "खडसे यांच्यावर भाजपने अंन्यय केला आहे.ते याविरुद्ध आवाजही उठवत असतात. परंतु ते आरपारची लढाई करीत नाहीत. ते उत्तर महाराष्टरातील दिग्गज नेते आहेत. त्यांना भाजपने संपविले आहे. देवेंद्र फडणवीस ग्रामीण भागातील  ओबीसी नेत्यांना असेच संपवण्याचे प्रयत्न करीत असतात. खडसे यांनी सुरू केलेली लढाई आता अर्ध्यावर सोडू नये. त्यांनी आता थेट सोक्षमोक्ष लावावा. खडसेंनी हे युद्ध पूर्णपणे लढले पाहिजे.  ते बोलतात आणि गप्प बसतात त्यामुळं त्याला काहीही अर्थ राहत नाही. हे माझ्या स्वभावात बसत नाही. बोलून गप्प बसले तर आपल्याही बोलण्याचा किंमत रहात नाही. पक्की कुस्ती खेळायची,"

मुंबईत शिवसेनेने माजी नौदल अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्यानंतर भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, "ते प्रशांत परिचारक सैनिकांबद्दल वाटेल ते बोलले होते. ते दीड वर्षे निलंबत राहिले होते. यांची आमच्या बद्दल बोलायची लायकी आहे का? यांचे खासदार उन्मेष पाटील यांनी २०१६ साली सैनिकाच्या कानफटात मारली होती. अजून त्यांना अटक झालेली नाही. उलटा चोर कोतवाल को डाँटे. यांना पहिल्यांदा शिक्षा झाली पाहिजे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख