जयंत पाटील भेटले पण 'आॅफर घेऊन नाही, तर आईच्या तब्येतीच्या चौकशीसाठी : राजू शेट्टींचा दावा

राज्यपालनियुक्त १२जागांच्या नेमणुकीबाबत सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या वाटयाला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जेव्हा राष्ट्रवादीशी आघाडी झाली तेव्हा विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे आश्वासन दिले होते
Jayant Patil Met Raju shetty
Jayant Patil Met Raju shetty

पुणे : "विधानपरिषद उमेदवारीबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रस्ताव अजून आलेला नाही.प्रस्ताव आल्यावर संघटनेच्या बैठकीत चर्चा होईल आणि आमचा उमेदवार ठरेल." असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. 'जयंत पाटील ऑफर घेऊन आले नव्हते तर माझ्या आईच्या प्रकृतीची चौकशी करायला आले होते.'असेही शेट्टी म्हणाले.

राज्यपालनियुक्त १२ जागांच्या नेमणुकीबाबत सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या वाटयाला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जेव्हा राष्ट्रवादीशी आघाडी झाली तेव्हा विधानपरिषदेची  एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे आश्वासन दिले होते.काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते डॉ महावीर अक्कोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना एक पत्र लिहून 'ठरल्याप्रमाणे एक जागा द्यावी."असे म्हटले होते.

राजू शेट्टी यांनीही याबाबत आठवण करून दिली होती. गेल्या महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी मिळेल अशी आशा होती पण तसे झाले नाही.राज्यपालनियुक्त १२ जागांपैकी एक जागा मिळेल असे सांगितले जात होते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन 'विधानपरिषदेची ऑफर दिल्याचे वृत्त माध्यमात आले होते. त्याबाबत प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले,"जयंत पाटील मला भेटायला आले होते पण ते ऑफर घेऊन आले नव्हते तर माझ्या आईच्या प्रकृतीचीचौकशी करायला आले होते.यावेळी राजकीय चर्चा फारशी झाली नाही.कौटुंबिक विषयावर बोलणे झाले."

"आम्ही राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची एक जागा मागितली आहे.अजून त्यांच्याकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यावर आमचा उमेदवार आम्ही संघटनेच्या बैठकीत ठरवणार आहोत."असेही शेट्टी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com