मोदींना कुठल्या जेलमध्ये ठेवले होते?.... - NCP Leader Jayant Patil Criticism on Narendra Modi over Bangladesh Speech | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींना कुठल्या जेलमध्ये ठेवले होते?....

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मार्च 2021

आपल्याला बांगलादेशाच्या मुक्तीसाठी तुरुंगावास भोगावा लागला होता, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष खिल्ली उडवली आहे.

मुंबई : आपल्याला बांगलादेशाच्या मुक्तीसाठी तुरुंगावास भोगावा लागला होता, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष खिल्ली उडवली आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा! मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन (Police Station) किंवा जेलमध्ये (Jail) ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे ट्वीट पाटील यांनी केले आहे. NCP Leader Jayant Patil Criticism on Narendra Modi over Bangladesh Tweet

मोदींनी (Narendra Modi) २६ मार्चला बांगलादेश (Bangladesh) मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली होती. या सर्व हुतात्म्यांनी सत्याच्या विजयासाठी अन्यायायाविरोधात लढा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. बांगलादेशच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नॅशनल परेड स्क्वेअरमध्ये (National Parade Square) आयोजित कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी बांगलादेश मुक्तीसंग्रामाबाबत भाषण केले होते. विशीमध्ये असतानाच मी माझ्या सहकाऱ्यांसोबत तेव्हा माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन केले होते. त्यावेळी मी बांगलादेशसाठी तुरुंगवासही भोगला होता, असे मोदी यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार खिल्ली समाजमाध्यमातून उडवली जात आहे. 

त्यावर पाटील यांनीही (Jayant Patil) यांनी ट्वीट केले आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मोदींनी या भाषणात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, आजचा दिवस हा वंगबंधूंचे आदर्श आणि त्यांनी दाखवून दिलेल्या दूरदृष्टीवर वाटचाल करण्याचा आहे. मुक्तियोद्ध्यांच्या भावनांचे स्मरण करण्याची हीच वेळ आहे. बांगलादेशच्या मुक्तीलढ्याला भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठा पाठिंबा मिळाला होता. या लढ्यातील इंदिरा गांधींचे योगदान सर्वांनाच माहिती आहे. खुद्द अटलबिहारी वाजपेयींनी या मुक्तीलढ्यातील क्रांतिकारकांचे कौतुक केले होते. माझ्या आयुष्यात बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. NCP Leader Jayant Patil Criticism on Narendra Modi over Bangladesh Tweet
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख