पंढरपूरच्या जागेसाठी भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात? - NCP to Conduct Survey for Pandharpur Bi Election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

पंढरपूरच्या जागेसाठी भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात?

भारत नागणे
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

ष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे आता पासूनच पडघम वाजू लागले आहेत. एकीकडे (कै) आमदार भालके यांच्या वारसाला संधी देण्याची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीने उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी मतदार संघात  सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे आता पासूनच पडघम वाजू लागले आहेत. एकीकडे (कै) आमदार भालके यांच्या वारसाला संधी देण्याची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीने उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी मतदार संघात  सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनीच  स्पष्टता दिली आहे. आमदार पवार यांच्या या  वक्तव्या नंतर इच्छुकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

सध्या भाजपात असलेले आमदार व माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. लोकांच्या मनातील उमेदवार दिला जाईल असेही आमदार पवार यांनी येथे सांगितले. रोहित पवार काल सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. सायंकाळी त्यांनी येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जवळगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंढरपूर विधानसभा पोट  निवडणुकी संदर्भात भाजपचे आमदार व माजी आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट ही केला. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ  उडाली आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, "जो योग्य उमेदवार असेल त्यांच्या सोबत राष्ट्रवादी राहणार आहे. सध्या भाजपात आमदार असलेले व माजी आमदार असलेले असे अनेक जण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. पोट निवडणुकीसाठी योग्य  व जनतेच्या मानातील उमेदवारालाच पक्षाची उमेदवारी दिली जाईल. त्यापूर्वी मतदार संघात पक्षाच्या वतीने सर्व्हे केला जाईल. त्यानंतर उमेदवारी बाबत पक्ष निर्णय घेईल,''

पंधरावर्षापूर्वी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात वीज वितरण कंपनीला 20 हजार कोटींचा तोटा होता. त्यानंतर राज्यात भाजप सरकार आल्यानंतर  वीज वितरण कंपनीचा तोटा  ५५ हजार कोटींवर गेला आहे. कोरोनाच्या काळात हाच तोटा ७० हजार कोटीवर गेला आहे. त्यामुळे  कंपनीवर मोठा आर्थिक ताण आहे. तरीही वीज माफी संदर्भात सरकार योग्य तो निर्णय घेईल असेही आमदार पवार यांनी सांगितले.

यावेळी आमदार संजयमामा शिंदे, विठ्ठलचे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुधीर भोसले, युवकचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे, युवती आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा श्रेया भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष गणेश पाटील आदी उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख