माझी इच्छा पूर्ण; आता समाधान आवताडे आमदार होणार!  - My wish is fulfilled; Now Samadhan Avtade will be the MLA: Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

माझी इच्छा पूर्ण; आता समाधान आवताडे आमदार होणार! 

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 30 मार्च 2021

सरकारमधील सर्व गोंधळलेले सरदार एकत्र आलेत.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : माझ्या मनात प्रचंड इच्छा होती की, मी आमदार व्हावे, ती पूर्ण झाली आहे. तशीच समाधान अवताडे यांची आमदार होण्याची इच्छा आहे. आज ती वेळ आलेली आहे, महायुतीतून समाधान आवताडे आमदार होणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. 

भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पडळकर बोलत होते.

या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, उमेदवार समाधान आवताडे, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, बी. पी. रोंगे, नगराध्यक्षा साधना भोसले, वसंत देशमुख, सभापती प्रेरणा मासाळ, दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी आदींसह मतदारसंघातील महायुती रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा :   भाजपने परिचारकांची ताकद पाठीशी उभी केली; पण आवताडे घरातीलच आव्हान कसे मोडून काढणार? 

(स्व) आमदार भारतनाना भालके हे या मतदारसंघातील शेतकऱ्यांची बाजू विधानसभेत मांडत होते. मात्र तेच सरकार आज भारतनानां विचाराच्या विरोधात काम करत आहे, त्यामुळे या पोटनिवडणुकीतील लढाई भारत भालके यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात नसून भ्रष्ट सरकारच्या विरोधात आहे, अशी टीका पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. 

आमदार पडळकर म्हणाले की जे सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो म्हणाले, त्यातील 18 लाख शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देतो म्हणाले. मात्र अजूनही दिले नाहीत. या खोटे बोलणाऱ्या सरकारच्या विरोधातील ही लढाई आहे. भारतनाना हे शेतकरी व कष्टकरी यांची बाजू विधानसभेत तळमळीने मांडत होते आणि हे सरकार नेमके त्यांच्या विरोधात काम करत आहे; म्हणून या सरकारविरोधात मोठ्या ताकदीने लढायचे. 

"सरकारवर 100 कोटी रुपये अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचा आरोप झाल्याने गोंधळलेल्या या सरकारमध्ये कुणाचा कोणाला मेळ नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्याचे प्रकरण बाहेर काढले. पोलिस अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवर पैसे मागितल्याचा आरोप केल्यावर गृहमंत्र्यांवरील आरोपाचे उत्तर गृहनिर्माण मंत्री व कामगार मंत्री देत आहेत. शिक्षण मंत्र्यांचे निर्णय आरोग्यमंत्री घेत आहेत, त्यामुळे सरकारमधील सर्व गोंधळलेले सरदार एकत्र आलेत. त्यांना या मतदारसंघातील जनतेचे काहीही पडलेले नाही, त्यामुळेच पाच वेळा विधानसभेत गेलेल्या परिचारक कुटुंबीयांनी पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक सहकारी संस्था मोठ्या केल्या. त्यांच्या वारसाने विधानसभा मतदारसंघ सोडत या निवडणुकीत पक्ष देईल, त्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका घेतली,'' असा दावा पडळकर यांनी केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख