कोल्हापूरच्या आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये हवा-पाण्याच्या गप्पा?

शाहू जयंतीच्या निमित्ताने कसबा बावडा येथील शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये जयंती दरवर्षी साजरी करण्यात येते. सकाळी आठ वाजता पालकमंत्री सतेज पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील दोघेही त्याठिकाणी हजर होते. दोघेही एकमेकांसमोर आल्यानंतर काय बोलणार, याची उत्सुकता होती.
Chandrakant Patil and Satej Patil Came together in Kolhapur for Program
Chandrakant Patil and Satej Patil Came together in Kolhapur for Program

कोल्हापूर : नेहमी एकमेकांवर टीका करणारे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील शाहू जयंतींच्या निमित्ताने एकत्र आले होते. दोघांनीही एकमेकांसमोर येताच एकमेकांना शाहू जन्म दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांच्यात काही वेळ गप्पाही झाल्या. गप्पा सुरू असताना हे दोघ नेमकं काय बोलताहेत हे ऐकण्यासाठी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी कान टवकारले होते.  

शाहू जयंतीच्या निमित्ताने कसबा बावडा येथील शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या  लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये जयंती दरवर्षी साजरी करण्यात येते. सकाळी आठ वाजता  पालकमंत्री सतेज पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील दोघेही त्याठिकाणी हजर होते. दोघेही एकमेकांसमोर आल्यानंतर काय बोलणार, याची उत्सुकता होती. 

सतेज पाटील दिसताच दादांनी बंटीसाहेब शाहू जन्म दिनाच्या शुभेच्छा, असा आवाज दिला तर सतेज पाटील हे देखिल दादा तुम्हालाही शुभेच्छा, असे म्हणत दादांच्या जवळ आले. सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम तेथे येईपर्यंत दोघांनी गप्पा मारल्या. दोघेही  काय बोलतात त्याकडे सर्वांचेच लक्ष होते. दोघांनी विशेष काही न बोलता हास्यविनोद केले आणि अभिवादन करण्यासाठी एकत्र गेले. त्यानंतर चहाच्या निमित्तानेही दोघांनी एकत्र येऊन चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com