उजनी पाणीप्रश्नी नारायण पाटील आक्रमक : इंदापूरला नेण्यात येणारे पाणी रद्द करा;अन्यथा... 

कुठे आहे कृष्णा नदीचे पाणी भीमेत?
Cancel water to Indapur; Otherwise, we will stop the tunnel work going to Marathwada: Narayan Patil
Cancel water to Indapur; Otherwise, we will stop the tunnel work going to Marathwada: Narayan Patil

करमाळा (जि. सोलापूर) : उजनीतील (Ujani) पाणी वापराचा तपशील पाहिल्यास धरणातून आता नवीन प्रस्तावांना मंजुरी देऊन पाणी देणे ही बाब करमाळा तालुक्यासह सोलापूर (Solapur) जिल्ह्यावर अन्याय करणारी आहे. नियोजित इंदापूर (Indapur) उपसा सिंचन योजनेचा सरकारी निर्णय तातडीने रद्द करा;अन्यथा मराठवाड्यासाठी (Marathwada) उजनीतून चालू असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी दिला. (Cancel water to Indapur; Otherwise, we will stop the tunnel work going to Marathwada: Narayan Patil)

पाटील यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उजनी धरणातील उपलब्ध पाणी व प्रत्यक्ष मंजूर योजनांचे एकुण पाणी याचा विचार केला असता आता उजनीतून एक थेंबही पाणी इतरत्र देण्यासारखी परिस्थिती नाही. महामंडळाच्या आकडेवारी (टीएमसी) नुसार भीमा प्रकल्प प्रवाही क्षेत्र (34.51) खासगी उपसा क्षेत्र (7.63) सीना-माढा उपसा (4.75) भीमा-सीना जोडकालवा (3.15) दहिगाव उपसा (1.81), शिरापूर उपसा (1.73), आष्टी उपसा (1) बार्शी उपसा (2.59), एकरुख उपसा (3.16), सांगोला उपसा (2), लाकडी-निंबोडी प्रस्तावित (0.57), मंगळवेढा उपसा (1.01), कृष्णा-मराठवाडा (17.98), आष्टी (बीडसाठी राखीव 5.68) असे पाणी वाटप नियोजन आहे. 

यातील मराठवाड्यासाठीचे काम चालू आहे, तर बीड जिल्ह्यातील आष्टीसाठी पाणी मंजूर आहे. दर वर्षी उन्हाळी तीन चार महिन्यांचा व वर्षभराच्या उन्हाचा विचार केल्यास 14.68 टीएमसी पाण्याचे तर बाष्फीभवन होते. उजनीवरुन पिण्यासाठी 2.49 टीएमसी पाण्याचा वापर होतो. तसेच, औद्योगिक कारणासाठी 3.26 टीएमसी पाणी वापरले जाते. धरणाचा एकुण पाणीसाठा 117 टीएमसी असून गाळ मोठ्या प्रमाणावर आहे. मृतसाठा हा 63.66 टीएमसी इतका आहे. एकुण पाणी नियोजन 84.30 टीएमसी आणि प्रत्यक्ष गाळ आणि मृतसाठा आणि बाष्पीभवन याचा विचार केल्यास पाणी वापर व मंजुरी याचा ताळमेळ कुठेच बसत नाही. आता नवीन प्रकल्पाना मंजुरी देणे म्हणजे मूळ नियोजन विस्कळीत करुन सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व योजनांवर गंभीर परिणाम करणारे आहे, असे पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.

यामुळे सरकारने अधिकारी व प्रत्यक्ष शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांच्यासह कार्यस्थळावर येऊन पाहणी करावी. गणिती आकडेमोडीत पाणी शिल्लक दाखवून सांडपाणी हा शब्दप्रयोग करुन सर्वांची दिशाभूल करु नये; अन्यथा मराठवाड्याला पाणी जाणार नाही. शेतकऱ्यांच्यामध्ये पाटबंधारे विभागाने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याबाबत प्रचंड रोष असून या रोषाचे आंदोलनात रुपांतर होऊन कृष्णा-मराठवाडा बोगद्याचे काम बंद पडेल, असा इशाराही माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कितीवेळा फसवणार?
 
कृष्णा-मराठवाडा योजनेसाठी 17.98 टिएमसी पाणी मंजूर असून बोगद्याचे काम चालू आहे. ही योजना मंजूर करत असताना कृष्णा नदीतून नीरा नदीत व नीरा नदीतून भीमा नदीत पाणी सोडून मराठवाड्यास पाणी नेले जाईल, असे सांगितले जात होते. कुठे आहे कृष्णा नदीचे पाणी भीमेत? उलट उजनीच्या मृतसाठ्यातूनच हे पाणी जाणार आहे. सुरवातीस फक्त 7 टीएमसी पाणी मंजूर करणार, असे सांगून आता 17.98 टीएमसी पाणी मंजुर करुन घेतले. अरे! कितीवेळा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फसवणार? आता मात्र मराठवाड्यासच काय पण भविष्यात बेकायदेशीर व मूळ पाणीवाटपात नसलेला एक थेंबही उजनीतून उचलू देणार नाही. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यांना इंदापूरला जाणारे पाणी कसे बेकायदेशीर आहे, हे पटवून सांगून हा आदेश रद्द करण्याची विनंती करणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com