चंद्रकांत पाटील आहेत कुठे? कार्यकर्त्यांना पडला प्रश्न

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतही चंद्रकांत पाटील वारंवार कोल्हापुरात येऊन प्रचाराचा आढावा घेत होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन महिन्यात चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व्यासपीठावर फारसे दिसले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी जिल्ह्यातील प्रचाराकडे फारसे लक्ष दिले नाही.
Chandrakant Patil
Chandrakant Patil

कोल्हापूर :  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गेल्या काही महिन्यात जिल्ह्यातील सामाजिक किंवा राजकीय व्यासपीठावर दिसले नाहीत. ग्रामपंचायत निवडणूक झाली. महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. मात्र चंद्रकांत पाटील मात्र आपल्याच जिल्ह्यात सक्रीय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ते येणार कधी आणि महापालिका निवडणुकीची व्युह रचना वाटप होणार कधी असा प्रश्‍न सर्व कार्यकर्त्यांना पडला आहे.

चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापुरचे. गेल्या पंचवार्षिकमध्ये ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे सर्वच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यासपीठावर ते नियमीतपणे दिसायचे. २०१५ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी आणि महाडिक कुटुंबाने केलेल्या व्युहरचनेमुळे सभागृहात भाजपचे संख्याबळ वाढले. पहिल्यांदाच भाजपच्या नगरसेवकांची संख्या दोन आकड्यात गेली. जिल्हा परिषदेत तर सत्तांतरच झाले. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मात्र भाजपला चांगलाच फटका बसला. भाजपचे दोन्ही आमदार पडले. 

चंद्रकांत पाटील हे चंदगढ किंवा उत्तर कोल्हापुर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवतील अशी खात्री होती. मात्र त्यांनी पुण्यातील कोथरूड मदरासंघातून निवडणूक लढवली. त्यांचा विजयही झाला. पण सत्तेचे समिकरण बदलले आणि भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. या काळात चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष होते.

निवडणुकीनंतर त्यांच्याकडे पूर्णवेळ प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे देण्यात आली. त्यानंतर त्यांचा कोल्हापुरातील संपर्क पूर्वीपेक्षा कमी झाला असला तरी वरचेवर ते इथल्या घरी येत होते. त्यांच्यात आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्यातील आरोप-प्रत्यारोप चांगलेच गाजले. 

दोन महिन्यांत फारशी उपस्थिती नाही

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतही चंद्रकांत पाटील वारंवार कोल्हापुरात येऊन प्रचाराचा आढावा घेत होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन महिन्यात चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व्यासपीठावर फारसे दिसले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी जिल्ह्यातील प्रचाराकडे फारसे लक्ष दिले नाही. महापालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. सर्वच पक्षांनी यासाठी जोरदार यंत्रणा लावली असून उमेदवार निश्‍चितीही अंतिम टप्प्यात आहे.

भाजपने मात्र अद्याप यामध्ये फारशी गती घेतलेली नाही. चंद्रकांत पाटील येऊन बैठका घेतली. इच्छुकांशी चर्चा करतील. तिकिट निश्‍चिती करतील अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात चंद्रकांत पाटील फारसे न आल्याने ते आहेत कोठे, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे?
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com