पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत राजकीय दंगल - Analysis of Pandharpur Mangalwedha Bi Election | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत राजकीय दंगल

दावल इनामदार
सोमवार, 5 एप्रिल 2021

पंढरपुर -मंगळवेढा (Pandharpur-Mangalwedha Bi Eleciton) विधानसभा पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानी चंग बांधला असून निवडणुकीचे (Election) वातावरण तापू लागले आहे.

ब्रह्मपुरी (सोलापुर) : पंढरपुर -मंगळवेढा (Pandharpur-Mangalwedha Bi Eleciton) विधानसभा पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानी चंग बांधला असून निवडणुकीचे (Election) वातावरण तापू लागले आहे. प्रथमच या पोट निवडणुकीत आवताडे गटाच्या दोन्ही भावामध्ये लढत पाहावयास मिळत असून कुठल्या उमेदवारास फटका बसणार हे मतदानातूनच कळणार आहे. Analysis of Pandharpur Mangalwedha Bi Election

मतदानाची जशी तारीख  जशी जवळ येते आहे, तसे विविध पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. आमदारकी पदरात पाडण्यासाठी उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आश्वासनांची बरसात करताना दिसत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली असून राजकीय दंगल पाहावयास मिळत आहे. सध्या ग्रामीण भागात कडक उन्हाचा चटका आहे. तरीही  वाडी वस्तीवर , चौक, झोपडपट्टी आदी भागात मतदान राजास भेटण्यासाठी गाव पुढारी उमेदवार कसरत करत असून नेत्यांचा चांगलाच घाम निघत आहे.

या पोट निवडणुकीत भाजप (BJP) उमेदवार समाधान आवताडे व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात तुल्यबळ लढत असली तरी अपक्ष उमेद्वार समाधान आवताडे यांचे बंधू सिद्धेश्वर आवताडे तसेच शैलजा गोडसे यांचेही उमेदवार अर्ज असल्यामुळे दोन्हीही पक्षातील उमेदवारांची डोके दुखी वाढली असून कोण किती मतदान आपल्या पदरात पाडण्यात यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. Analysis of Pandharpur Mangalwedha Bi Election

त्यामुळे फटका कोणास बसणार? कोण आमदारकीची माळ गळ्यात पडणार? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जि. प सदस्य शैला गोडसे यांनी आपल्या मतदार संघात रास्ता रोको, मोर्चे, विविध विकास कामे ,गाठी भेटी यांच्या माध्यमातून संपर्काचे जाळे विणले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून सिद्धेश्वर आवताडे यांचा मंगळवेढा तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात संपर्क आहे. त्यांनी विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या जोरावर मतदार संघात प्रचार दौरा, गाठी भेटी यावर जोर दिला आहे.

मंगळवेढा मतदार संघ हा पूर्वीपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी (NCP) पक्षास माननारा असून नगरपालिका ताब्यात असून हा पक्ष तालुका व ग्रामीण भागात संघटनेच्या निवडी,लोक चळवळ, मोर्चे,उपोषण, रास्ता रोखो अशा माध्यमातून आक्रमक असून पक्षाची फळी निर्माण केली आहे. फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या "महाराष्ट्रातील चार पक्षापैकी महाविकास (Maha Vikas Aghadi) आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र असतील तर तिथे कोणीही मायेचा लाल निवडून येणार नाही'' अशी क्लिप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्टेटस वर ठेऊन प्रचाराचा धुरळा उडवला आहे.

जनतेचे आमदार म्हणून ओळख असलेले स्व.भारत भालके यांचे पुत्र  भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना  राष्ट्रवादी पक्षाने  उमेदवार देऊन विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीतील  कार्यकर्ते नियोजनबध्द 'करेक्ट कार्यक्रम' करीत मतदार संघ पिंजून काढत  आहेत.  विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचा मंगळवेढा-पंढरपुर मतदार संघात चांगला संपर्क असून विविध सहकारी संस्थाच्या माध्यमातून, उपस्थीति,नगरपालिका,संपर्क कार्यालय यावर गाठी भेटीस जोर दिला आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी मतदार संघात गाठी भेटी ,प्रचार दौरा करत व आपल्या कार्यकर्त्यांचा ताळ मेळ लावत आहेत. Analysis of Pandharpur Mangalwedha Bi Election

मागील निवडणुकीत 50 हजारापेक्षा अधिक मतदान असलेल्या मंगळवेढ्याचेसमाधान आवताड़े यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सध्या आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जि. प सभापती ,सहकारी संस्था,अनेक ग्रामपंचायत असून त्यांनी आपल्या गटाचे शहरी व ग्रामीण भागात जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची  होणार असून पंढरपूर -मंगळवेढा ग्रामीण भागात 'आमदार आमचाच' होणार अशा चर्चेला  उधाण आले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख