का वाढत आहेत औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण? 

शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 15 मार्चला आढळला. त्यानंतर 26 एप्रिलपर्यंत 53 रुग्ण होते. दरदिवशी 1.26 रुग्ण सापडत होते; पण 27 एप्रिल ते 11 मेपर्यंत 566 रुग्ण आढळले. अर्थात या काळात दरदिवशी 37 एवढे रुग्ण आढळले आहेत. देशाचा डबलिंग रेट 10.2 असताना शहराचा हा रेट पाचपर्यंत पोचला आहे.
Why Corona patients are increasing in Aurangabad
Why Corona patients are increasing in Aurangabad

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 15 मार्चला आढळला. त्यानंतर 26 एप्रिलपर्यंत 53 रुग्ण होते. दरदिवशी 1.26 रुग्ण सापडत होते; पण 27 एप्रिल ते 11 मेपर्यंत 566 रुग्ण आढळले. अर्थात या काळात दरदिवशी 37 एवढे रुग्ण आढळले आहेत. देशाचा डबलिंग रेट 10.2 असताना शहराचा हा रेट पाचपर्यंत पोचला आहे. रुग्णसंख्याही वाढतीच आहे. याला महत्त्वाच्या कारणांसह बेजबाबदार नागरिक, प्रशासनाच्या मर्यादा, कमतरता, चुका, वैद्यकीय अपुरी क्षमता आदी महत्त्वाची कारणेही आहेत. 

परिसर दाट लोकवस्तीचा 

औरंगाबादेत आता 627 इतकी रुग्णसंख्या झाली आहे. केवळ 15 दिवसांत 574 रुग्ण वाढले आहेत. पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत 57 दिवस झाले आहेत. औरंगाबादेत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी 79.67 टक्के रुग्ण मुकुंदवाडी, बेगमपुरा, जिन्सी, सिटी चौक, पुंडलिकनगर, क्रांती चौक या सहा पोलिस ठाणे हद्दीतील आहेत. या हद्दीतील बाधित रुग्णांचा परिसर दाट लोकसंख्येचा आहे. तेथील बहुसंख्य नागरिक हलाखीच्या स्थितीतील, गरीब, निम्न मध्यमवर्गीय आहेत. सर्वात कमी रुग्ण सिडको, एमआयडीसी सिडको, वेदांतनगर, जवाहरनगर, उस्मानपुरा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील भागातील आहेत. याचाच अर्थ दाट लोकवस्तीचा भाग कोरोनासाठी पोषक ठरत आहे.

ठाण्यांच्या हद्दीनिहाय लोकवस्तीतील रुग्ण   


मुकुंदवाडी
 
135

बेगमपुरा

125 
सिटी चौक 96

सातारा

91
जिन्सी
 
62 
पुंडलिकनगर  
 
36

क्रांती चौक

30

छावणी

22
एमआयडीसी सिडको
 
04
वेदांतनगर
 
07

औरंगाबाद ग्रामीण

12
सिडको
 
06
एमआयडीसी वाळूज
 
02
जवाहरनगर  
 
02
उस्मानपुरा
 
03
एकूण रुग्ण : 627

या भागांत जास्त रुग्ण; पण का... 

- या भागांत मजूर, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. परिणामी या भागातील लोकांना काही ना काही कारणासाठी बाहेर पडावेच लागते. 
- विशेषतः या भागात लोक भाड्याने राहण्याचे प्रमाणही मोठे आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह आणि स्नानगृहाचाही वापर 
- दाट घरे, किरकोळ वस्तूंसाठी बाहेर पडणे हेही कारण आहे. 
- पुंडलिकनगर येथील भाजी विक्रेता असो की फर्निचरचे काम करणारा समतानगरचा तरुण, त्यातून मोठी लागण झाली. 
- अर्थात हायरिस्क कॉन्टॅक्‍टमधील लोकांचा संपर्कही धोक्‍याचा ठरत आहे. 
- फिजिकल डिस्टन्स इतरांशी पाळले जात आहे; पण कुटुंबीयांसोबत नाही. त्याचा मोठा फटका बसत आहे. 
- अल्प उत्पन्न, निम्न उत्पन्न गटातील लोक बाधित 
- शिक्षणाचा अभाव असणारा समूह 
- दाट लोकसंख्या, जास्त घनतेचा परिसर व अज्ञान 
- हातावर पोट असणाऱ्या या भागातील लोकांना बाहेर पडावेच लागते. 
- घराला घर जोडून असलेल्या भागात संशयित रुग्ण फिरू शकतात. त्यातून संसर्गही. 
- प्रशासनाच्या सुरवातीच्या काळातील चुका. मृतदेह सोपविताना न घेतलेली खबरदारी. 
- मर्यादित साधने, अपुरे मनुष्यबळ, गतिमान आरोग्य सुविधांचा अभाव, बेजबाबदार नागरिक. 

कोरोना विदेशातून आलेल्या लोकांनी भारतात आणला. पण त्याची किंमत आता गरिबांना मोजावी लागत आहे. जगाच्या तुलनेत कोरोनाचे लोण औरंगाबादमध्ये उशिरा सुरू झाले. त्यातच येथे टेस्टिंगही उशिराच सुरू झाली. दिवस पुढे जातील तसे आकडेही सरकतील. ते धक्कादायक नाहीत. टेस्टिंग झाल्यानंतर खरी परीक्षा आहे. आताचे आकडे भीतीदायक वाटत नाहीत. अजून वाढेल तेव्हा खरी स्थिती पाहणे योग्य ठरेल. गरीब, दाट लोकवस्तीत कोरोना पसरत आहे. 
- देविदास तुळजापूरकर, सहसचिव, एआयबीईए 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com