अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचीही चौकशी होईल!  - Union Minister Raosaheb Danve criticizes the state government | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचीही चौकशी होईल! 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 25 एप्रिल 2021

सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर धाडी टाकून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला.

जालना : राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत असुन राज्य सरकारने मधल्या काळात कोरोना रुग्णवाढीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. 

ते यावेळी म्हणाले की, ''केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात मदत केली असून सर्व राज्यांना समान वागणूक दिली आहे. एकदा केंद्राने आणि राज्याने काय केले याचा हिशोब व्हायला हवा असे, सांगायला देखील दानवे विसरले नाहीत. राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील रुग्णालयातील दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारने या घटनांतुन बोध घेऊन ऑडिट करावे असे सांगत सध्या राज्यातील प्रत्येक मंत्री वेगवेगळे विधान करून राजकारण करत आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी असेही दानवे यांनी म्हटले आहे.

पवारांच्या आवाहनास अभिजित पटालांचा प्रतिसाद; धाराशिव कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प
 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दोन महिने राजकारण थांबवावे, असे म्हटले होते. यावर बोलतांना भाजप कोणतेही राजकारण करत नाही, तुम्ही राजकारण करू नका असे दानवे म्हणाले. 

सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर धाडी टाकून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला. यासंदर्भात विचारले असता कायदा कायद्याचे काम करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रकरणात सचिन वाझे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचेही नाव घेतल्याने त्यांचीही चौकशी होईल, असा दावा दानवे यांनी केला. 

रेमडेसिव्हिर वाटपात जालना जिल्ह्यात राजकारण सुरु आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यास राजकारण होईल. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नसल्याचे दानवे यांनी सांगितले. 

अशी ही भाऊबंदकी : आमदार काकाचे करिअर उद्धवस्त करण्यासाठी पुतण्याचाच डेंजर डाव!

 
दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासह, कार्यालयांमध्ये झाडाझडती देखील घेतली आहे. सीबीआयच्या या कारवाईनंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या अनिल देशमुख यांनी फार काही बोलण्याचे टाळत, मोजक्या शब्दांमध्येच प्रतिक्रिया दिली.

''सीबीआयची टीम तपासणीसाठी घरी आली होती. त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. आता मी नागपुर जिल्ह्यात ज्या पद्धतीने कोरोना वाढतो आहे, या पार्श्वभूमीवर काही कोरोना रुग्णांलयांना भेट देण्यासीठी काटोलला चाललो आहे.'' असे देशमुख यांनी म्हणाले होते.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख