वडेड्डीवारांच्या बैठकीचे आमंत्रण सत्ताधारी आमदारालाच नाही - Shivsena MLA Not invited in Vijay Vadettiwar Meeting at Nanded | Politics Marathi News - Sarkarnama

वडेड्डीवारांच्या बैठकीचे आमंत्रण सत्ताधारी आमदारालाच नाही

संतोष जोशी
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

आज सकाळी आठ वाजता मंत्री विजय वडेट्टीवार यांची जिल्ह्यातील अतिवृष्टी च्या परिस्थिती बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना निमंत्रीत करण्यात आले नव्हते. त्यामुळे कल्याणकर यांनी बैठकीत येऊन वडेट्टीवार यांच्या समोर बैठकीस का निमंत्रित करण्यात आले नाही, असा सवाल विचारला

नांदेड : नांदेडमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आज सकाळी झालेल्या आढावा बैठकीस महाविकास आघाडीतील सत्ताधारी आमदारालाच निमंत्रित करण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

आज सकाळी आठ वाजता मंत्री विजय वडेट्टीवार यांची जिल्ह्यातील अतिवृष्टी च्या परिस्थिती बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना निमंत्रीत करण्यात आले नव्हते. त्यामुळे कल्याणकर यांनी बैठकीत येऊन वडेट्टीवार यांच्या समोर बैठकीस का निमंत्रित करण्यात आले नाही, असा प्रश्न करत स्थानिक प्रशासनावर  प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि भर बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला. संतापलेल्या आमदार कल्याणकर यांना स्वतः वडेट्टीवार  यांनी समजावून शांत केले.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सलगरा येथे दुष्काळी परिस्थितीचा दौरा करण्यासाठी आलेल्या मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांनी घेरोव घातला. पाहणी दौरे बंद करा, आधी ..ओला दुष्काळ जाहीर करा, अशा घोषणा देत आंदोलन केले. शेतकऱ्यांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे वातावरण तणाव पूर्ण झाले होते. मंत्री वडेट्टीवार यांनी आंदोलकांशी चर्चा करुन शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले आणि सरकारपर्यंत भावना पोहंचविण्याचे आश्वासन दिले.

नुकत्याच परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाहणी दौरा सुरु केला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर देवणी निलंगा शिरुर अनंतपाळ या तालुक्यातील विविध भागात दौरा सुरु असून हाताशी आलेला शेतकऱ्यांचा घास निसर्गाच्या प्रकोपाने कसा हिरावून घेतला याची ते पाहणी करत आहेत. 

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा व परिस्थिती पाहत विजय वडेट्टीवार यांनी दौरा करत आहेत. शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. पण चालू वर्ष हे संकटाचे वर्ष असून कोरोना चक्रीवादळ व अतिवृष्टी सारख्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत केंद्राला पत्रव्यवहार केला आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. केंद्राच्या पथकाने सुद्धा पाहणी करावी अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकऱ्यांना नक्कीच मदत करणार असल्याचे व महाविकास आघाडी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख