राऊतांच्या घरातल्या सदस्याला ईडीची नोटीस; नितेश राणेंचा दावा

संजय राऊत यांच्या घरातील एका सदस्याला ईडीची नोटीस आली असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे बोलताना केला. भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा खळबळजनक दावा केला
Sanjay Raut NItesh Rane
Sanjay Raut NItesh Rane

हिंगोली : संजय राऊत यांच्या घरातील एका सदस्याला ईडीची नोटीस आली असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे बोलताना केला. भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा खळबळजनक दावा केला. 

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी ने छापा टाकून , सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना चौकशी साठी  इडी  कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी  नोटीस दिली आहे. यावरुन शिवसेना नेते भाजप वर चांगलेच संतापले आहेत. दरम्यान , आता संजय राऊत यांच्या घरातील सदस्याला देखील इडीची नोटीस आल्याची माहिती मिळाली असल्याचं सांगत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी नितेश राणे हिंगोली जिल्ह्यात प्रचार करत आहेत, दरम्यान आज भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. आपल्याला ही माहिती बाहेरून ऐकायला मिळाली असल्याचे सांगत, राऊत ज्या पद्धतीने तडफड करत आहेत, त्या वरून हे खरे असावे असे वाटते, असे राणे म्हणाले. राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना त्यामुळेच भेटायला गेले होते का, अशी शंका देखील राणे यांनी उपस्थित केली आहे.  दरम्यान या वेळी  ठाकरे सरकारवर देखील राणे यांनी सडकून टीका केली.

दरम्यान, कोणती चौकशी कोण, कुठे कशी लावत आहे, ते काही कळत नाही. एक मात्र खरं की सगळ्यांच्या मागे ईडी लागलेली आहे. आज ना उद्या चौकशी होणारच. त्यामुळे त्याचाही सामना संपूर्ण ताकदीनिशी करण्यात येईल, असे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल म्हणाले. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आणि पुणेतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे पटेल चांगलेच संतापले आहेत. परकीय चलनाविषयीच्या फेमा कायद्यांअंतर्गत विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयात तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com