राष्ट्रवादीच्या आमदाराचा देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्रित प्रवास 

त्याचवेळी त्याच विमानात योगायोगाने भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही होते.
NCP MLA travels with Devendra Fadnavis on the same plane
NCP MLA travels with Devendra Fadnavis on the same plane

औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी मुंबईपर्यंत एकाच विमानातून प्रवास केला. हिंगोलीला एका  खासगी कार्यक्रमासाठी गेलेले फडणवीसही योगायोगाने त्याच विमानात होते. 

त्या दोघांनी एकाच सीटवर शेजारी शेजारी बसून औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास केला. त्यांचे विमान आज (ता. 5 डिसेंबर) रात्री नऊ वाजता मुंबईच्या विमानतळावर पोचल्याचे सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी 58 हजार पेक्षा जास्त मताधिक्‍य घेत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव केला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आमदार सतीश चव्हाण आज रात्रीच्या विमानाने मुंबईला रवाना झाले. 

त्याचवेळी त्याच विमानात योगायोगाने भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही होते. फडणवीस हिंगोलीला एका लग्नसमारंभासाठी गेले होते. तेथून ते औरंगाबाद विमानतळावर आले व मुंबईला जाण्यासाठी विमानाने मुंबईला रवाना झाले. एकाच विमानाने दोघांनीही एकत्रित प्रवास केला. खरे तर मधली खुर्ची सोडून ते शेजारी-शेजारी बसले होते. पदवीधर निवडणुकीच्या विजय-पराभवाच्या धर्तीवर हे चित्र पाहून अनेकजण अवाक झाले. 

आमदार चव्हाण यांच्यासोबत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिजित देशमुख, रोहीत देशमुख, चव्हाण यांचे प्रचारप्रमुख नितीन बागवे होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार प्रशांत बंब होते. चव्हाण आणि फडणवीस यांच्यामध्ये प्रवासादरम्यान पदवीधर निवडणूक व इतर राजकीय मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

"सोशल' सोबतच राजकीय डिस्टन्सिंग 

विमानात खिडकीशेजारील सीटवर देवेंद्र फडणवीस बसले होते. मधले सीट रिकामे ठेवून त्याबाजूच्या सीटवर आमदार सतीश चव्हाण बसले होते. हे "सोशल' सोबतच राजकीय डिस्टन्सिंगही होते काय? अशी चर्चा विमानात रंगली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com