गहिनीनाथगडाच्या पादुकांच्या परवानगीवरुन खासदार मुंडेंची नाराजी ! 

नाथ संप्रदयातील गहिनीनाथांची संजीवन समाधी असलेल्या गहिनीनाथगडावरुन संत वामनभाऊ यांनी सुरु केलेली पादुका पालखी सोहळ्याला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे.
गहिनीनाथगडाच्या पादुकांच्या परवानगीवरुन खासदार मुंडेंची नाराजी ! 

बीड : गहिनीनाथ गड संस्थानने गडाच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी शासनाकडे रितसर परवानगी मागितली होती. मी देखील परवानगी मिळावी म्हणून पाठपुरावा केला होता. परंतु, भक्तीत भेदभाव होतो याची मला कल्पना नव्हती.

मी तर खूप प्रयत्न केले ! गहिनीनाथ गडाच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी जाऊ शकल्या नाहीत या उदासीचे काळे ढग आज आषाढी एकादशीच्या उत्साहावर दाटून आले आहेत, अशी नाराजी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केली. 

पाटोदा तालुक्‍यातील चिंचोली येथील गहिनीनाथगडावर नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथांची संजीवन समाधी आहे. नाथ संप्रदायातील एक महत्वाचे तिर्थक्षेत्र म्हणून गहिनीनाथ गड प्रसिद्ध आहे.दर दिवशी शेकडो भाविक भक्त नाथांच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले हे क्षेत्र आहे. असून तेथूनच संत वामनभाऊ महाराजांनी वारकरी संप्रदायाचे कार्य सुरू करून ते सर्वत्र पोहोचविले. 

दरवर्षी पौंष वद्य अष्टमीला लाखो भावीक एकत्र येऊन संत वामनभाऊंची पुण्यतिथी साजरी करतात. दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त गडाचे महंत विट्ठल महाराजांच्या पुढाकाराने ज्येष्ठ वद्य आमावास्येला पंढरीला जाण्यासाठी पालखीचे प्रस्थान होते. निवडुंगा ते मातकुळी, सारोळा, पिंपळगाव उंडा, तांदळवाडी, मिरभवान, वरकुटे, भोगेवाडी, आरण मार्ग असा नऊ दिवस प्रवास करून दहाव्या दिवशी आषाढ शुद्ध नवमीला ही पालखी पंढरपुरात पोहोचते. 

तर, सहा दिवसांनंतर परतीचा दहा दिवस प्रवास असा दिवसांचा प्रवास असतो. यामध्ये ते हजार वारकऱ्यांची संख्या असते. घोडे, रथ, बैलगाडी असा लवाजामा असतो. यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळे रद्द केले. पंरतु, प्रमुख पालख्यांना शासनाने अटींवर परवानगी दिली. 

वारकरी संप्रदायात मानाचे स्थान असलेल्या गहिनीनाथ गडाच्या पादुकांना पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, शासनाने परवानगी नाकारली. 
त्यामुळे वारकरी संप्रदायाचे मूळपीठ असलेल्या गहिनीनाथ गडाची वर्षांची परंपराखंडित झाली. त्यावर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भक्तीत भेदभाव होतो याची मला कल्पना नव्हती, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. 

गहिनीनाथ गडाच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी जाऊ शकल्या नाहीत या उदासीचे काळे ढग आज आषाढी एकादशीच्या उत्साहावर दाटून आले आहेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com