Former Beed MP Jaysingrao Gaikwad joins NCP
Former Beed MP Jaysingrao Gaikwad joins NCP

जयसिंगराव गायकवाडांचं मन भाजपत रमलं नाही : शरद पवार 

जयसिंगराव गायकवाड यांना सत्तेची पदे मिळाली. पण, सत्तेचा दर्प त्यांच्या जीवनात आपल्याला कधीही बघायला मिळाला नाही.

मुंबई : "जयसिंगराव गायकवाड यांनी विधिमंडळ आणि संसदेत काम केलं आहे, त्यामुळेच कदाचित पुन्हा एकदा काम करण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असावी. पण, त्यांचं मन भाजपात रमलं नाही,' असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज (ता. 24 नोव्हेंबर) शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात त्यांचे स्वागत केल्यानंतर पवार बोलत होते. 

ते म्हणाले की, "खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत सामान्य माणसांची सुख-दुःख समजून घेत असत. जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले आहे. संसदेत निवडून आल्यानंतर स्वःतच्या घरी राहायला गेला नाही, असे एकमेव खासदार गायकवाड असतील, असं मला वाटतं. ते बहुतांश वेळा कार्यकर्त्यांच्या घरी, देऊळ, चावडी आदी ठिकाणी मुक्काम करत असत.' 

"जयसिंगराव गायकवाड यांना सत्तेची पदे मिळाली. पण, त्यांनी जमिनीवरील पाय कधीही हलू दिले नाहीत आणि सत्तेचा दर्प त्यांच्या जीवनात आपल्याला कधीही बघायला मिळाला नाही. सत्ता ही विनम्रतेने संभाळायची असते आणि ती विनम्र सत्ता अधिक शोभीवंत दिसते, या प्रकारचा आदर्श जयसिंगरावांनी आपल्या उभ्या आयुष्यात दिला आहे,' अशा शब्दांत शरद पवार यांनी गायकवाड यांच्या कामाचे कौतुक केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कुटुंबात पुन्हा आपला एक घटक येतोय, याचा आनंद झाला आहे. गायकवाड यांच्या पक्ष प्रवेशाचा आनंद फक्त बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाचा झाला असा नव्हे; तर राज्यातील कार्यकर्त्यांनाही झाला आहे, असेही पवार यांनी नमूद केले. 

पवार म्हणाले, "आज राज्यातील आणि देशातील चित्र कसे आहे, याची आपल्याला जाण आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली आहे. राज्य चालवयाचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना संकटातून कधी एकदा बाहेर पडतो, असं सगळ्यांना झालं आहे. पण, सगळ्या संकटावर मात करून राज्य सरकार शेवटच्या घटकापर्यंत काम करते आहे.' 

केंद्रातील सत्ताधारी सत्तेचा वापर हा कशाप्रकारे करतात, हे आज शिवसेनेच्या एका प्रतिनिधीवरून केलेल्या कारवाईवरून दिसून आलं. आज अनुभवी माणसांची गरज आहे आणि त्यामुळेच जयसिंगराव गायकवाडांचा निर्णय महत्वाचा वाटतो, असे शरद पवार यांनी नमूद केले. 

गावागावांत राष्ट्रवादी कॉंग्रेसची संघटना उभी करण्याची तयारी केली होती. पण, कोरोनामुळे ते शक्‍य झालं नाही. पणख, आता पुन्हा उभी करू, असा विश्‍वासही पवार यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com