वैद्यकीय शिक्षण संचनालयाने खरेदी केलेले कोरोना कीट सदोष : टोपे यांचा मोठा खुलासा - Corona Testing Kits Purchased by Medical Education Department Faulty | Politics Marathi News - Sarkarnama

वैद्यकीय शिक्षण संचनालयाने खरेदी केलेले कोरोना कीट सदोष : टोपे यांचा मोठा खुलासा

लक्ष्मण सोळुंके
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

जीसीसी बायोटेक कंपनीच्या आरटीपीसीआर किटसमध्ये लो पॉझीटीव्हीटी रेट आढळून आले आहेत, त्यामुळे जीसीसी बायोटेक कंपनीच्या आरटीपीसीआर किटस् सदोष असल्याची धक्कादायक माहिती खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

जालना : जीसीसी बायोटेक कंपनीच्या आरटीपीसीआर किटसमध्ये लो पॉझीटीव्हीटी रेट आढळून आले आहेत, त्यामुळे जीसीसी बायोटेक कंपनीच्या आरटीपीसीआर किटस् सदोष असल्याची धक्कादायक माहिती खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

एनआयव्हीचा एक रिपोर्ट नुकताच सामोर आला आहे. त्यात जीसीसी बायोटेक कंपनीचे आरटीपीसीआर किटस् सदोष असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं असल्याचं देखील टोपे यांनी सांगितलंय. त्यामुळे कंपनीकडून राज्यभरात वाटण्यात आलेले आरटीपीसीआर किटस् सदोष असल्याने त्या द्वारे होणाऱ्या टेस्ट थाबण्याचे  आदेश ही देण्यात आले असल्याचे टोपे यांनी सांगितलं. 

आरोग्य खात्याचा संबंध नाही

या सगळ्या किट्स वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने खरेदी केल्या असल्याने या बोगस कीट्स खरेदी संदर्भात आरोग्य खात्याचा किंचितही संबंध येत नसल्याचे ही टोपे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या किट बाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालया जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणे हा पर्याय समोर असल्याचं टोपे यांनी सांगितले आहे. यापुढे एनआयव्हीच्या तज्ज्ञांची समिती नेमून किटसचे वाटप केले जाणार असून सर्व दक्षता घेतली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

बबनराव लोणीकरांवर केली टीका

दरम्यान, याच संदर्भात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यांनी राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यावर लोणीकर यांना आरोप करण्याशिवाय दुसरा धंदा राहिलेला नाही, अशी टीका टोपे यांनी काल केली होती. त्यानंतर त्यांनी या किट्स सदोष असल्याचे सांगितले आहे. बनावट चाचणी किटसमुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्याचा आरोप लोणीकरांनी केला आहे. राज्यात १२ लाख ५० हजार किट्स खरेदी करण्यात आली असून ज्यांनी या किट्स खरेदी केल्या आणि ज्यांच्याकडून खरेदी केल्या त्या सर्वांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लेखी तक्रारीच्या माध्यमातून लोणीकर यांनी केली आहे.

त्यावर राजेश टोपे यांनी आमदार बबनराव लोणीकरनां आरोपा शिवाय दुसरा धंदा राहिला नसल्याने त्यांनी तिथं तिथं बघावं असं टोपे म्हणाले होते. पीपीई किट्स सह सर्व खरेदी जिल्हाअधिकारी स्तरावर केली जाते.  त्यामुळे कुठेही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्या बाबत चौकशी केल्या जात असते. त्यामुळे लोणीकरांनी भान ठेवून बोलले पाहिजे असा सल्लाही टोपे यांनी दिला होता.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख